ETV Bharat / bharat

Shyam Saran Negi : भारताच्या पहिल्या मतदारावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; घालून दिला 'हा' आदर्श

देशातील पहिले मतदार मास्टर श्याम सरन नेगी (Shyam Saran Negi Funeral) पंचतत्त्वात विलीन झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. श्याम सरण नेगी यांचे कुटुंबीय, प्रशासनासह ग्रामस्थांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. पारंपारिक विधी करून त्यांची अंतिम यात्रा काढण्यात आली. अंत्यसंस्कारावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

author img

By

Published : Nov 5, 2022, 5:47 PM IST

Shyam Saran Negi
श्याम सरन नेगी

किन्नौर (हिमाचल प्रदेश) : देशातील पहिले मतदार मास्टर श्याम सरन नेगी (Shyam Saran Negi Funeral) पंचतत्त्वात विलीन झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. श्याम सरण नेगी यांचे कुटुंबीय, प्रशासनासह ग्रामस्थांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. पारंपारिक विधी करून त्यांची अंतिम यात्रा काढण्यात आली. अंत्यसंस्कारावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्वतंत्र भारताचे पहिले मतदार (First Voter) काळाच्या पडद्याआड (Passed Away) गेले आहेत.

श्याम सरन नेगी यांच्यावर अंत्यसंस्कार

दोन दिवसांपूर्वीच केले होते मतदान - श्याम सरन नेगी हे भारताचे पहिले मतदार होते, त्यांनी वयाच्या 106 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पण मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले होते. त्यामुळे त्यांनी हा मोठा आदर्श नागरिकांना घालून दिला आहे. यावेळी किन्नौरचे डीसी आबिद हुसैन सादिक म्हणाले की, देशातील पहिले मतदार श्याम सरन नेगी आता आपल्यात नाहीत. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते म्हणाले की, श्याम सरन नेगी यांनी जाता जाता आपले कर्तव्य बजावले असून, दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मतदान केले. त्यामुळे इतिहासाच्या पानात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - हिमाचलमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 80 वर्षांवरील वृद्ध आणि दिव्यांगांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने दिली आहे. घरबसल्या मतदान करू इच्छिणारे 12D फॉर्म भरू शकतात. त्यानंतर निवडणूक आयोग त्यांच्या घरून मतदानाची व्यवस्था करते. श्याम सरन नेगी यांनीही याच प्रक्रियेत घरून मतदान केले होते. जिल्हा प्रशासनाने नेगी यांच्या घरी मतदानाची व्यवस्था केली होती. मतदान करण्यावेळी देशातील पहिल्या मतदाराचे रेड कार्पेटवर जल्लोषात स्वागत केले. प्रत्येक वेळी निवडणुकीत आयोगाकडून नेगी ज्या मतदान केंद्रावर मतदान करायचे तेथेही ही व्यवस्था करण्यात आली होती. अशाप्रकारे श्याम सरन नेगी यांचे हे शेवटचे मतदान ठरले आहे.

1951 मध्ये पार पडलं पहिलं मतदान : देशामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक 1951 साली पार पडली. ही निवडणूक पाच महिने चालली होती. भारताचे पहिले मतदार म्हणून श्याम सरण नेगी यांनी 25 ऑक्टोबर 1951 रोजी पहिल्यांदा मतदान केले होते. 1951 मध्ये नेगी यांनी पहिल्यांदाच संसदीय निवडणुकीत मतदान केले. यानंतर त्यांनी एकाही निवडणुकीत आपला सहभाग सोडला नाही. मला माझ्या मताचे महत्त्व माहित आहे, असे नेगी सांगायचे. 'शरीर साथ देत नसेल तर स्वबळाच्या जोरावर मला मतदानाला जायचे आहे. या निवडणुकीत माझे हे शेवटचे मतदान असू शकते, अशी भीतीही त्यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर आज वृद्धापकाळाने आज त्यांचं निधन झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.