पणजी - मोपा विमानतळाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच पहिला टप्पा कार्यरत होणार आहे. नागरी हवाई उड्डाण विभागाचे संचालक सुरेश शानभाग यांनी मोपाच्या घावपट्टीचा फोटो सोशल मीडियावरुन शेअर केला आहे.
एअरपोर्टवरून 15 ऑगस्ट 2022 ला पहिले विमान झेप घेणार - उत्तर गोव्यात बांधण्यात येणाऱ्या मॉपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन 2018 साळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. गोवा आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर असणार्या पेडणे तालुक्यात हा एअरपोर्ट उभारण्यात आला आहे. साधारण 3000 कोटी अंदाजित खर्च असणाऱ्या या एअरपोर्टवरून 15 ऑगस्ट 2022 ला पाहिले विमान झेप घेणार आहे. त्याविषयीची सर्वोतपरी तयारी सुरू सुरू केली आहे. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार असल्याची माहितीही सरकारच्यावतीने देण्यात आली. गोव्यात उत्तर भागात मोठ्या प्रमाणात अनेक देशी-विदेशी पर्यटक येत असतात त्यांना या विमानतळाचा फार मोठा फायदा होणार असून लगत असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातही यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे.
विमानतळावर अतिरिक्त भार - सध्या गोव्यात दाबोली येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून हे विमानतळ भारतीय नव दलाचे असून यावरून तात्पुरत्या स्वरूपात हवाई वाहतूक केली जात आहे. काही वेळा नऊ दलाची विमाने व आंतरराष्ट्रीय वाहतुकीचे विमान यांच्यामुळे या विमानतळावर अतिरिक्त भार पडत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी भारत सरकारच्यावतीने उत्तर गोव्यात मोपा येथे नवीन विमानतळ उभारण्यात येत आहे.
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 15 ऑगस्टला उडणार पहिले विमान
उत्तर गोव्यात बांधण्यात येणाऱ्या मॉपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन 2018 साळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. गोवा आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवर असणार्या पेडणे तालुक्यात हा एअरपोर्ट उभारण्यात आला आहे. साधारण 3000 कोटी अंदाजित खर्च असणाऱ्या या एअरपोर्टवरून 15 ऑगस्ट 2022 ला पाहिले विमान झेप घेणार आहे.