ETV Bharat / bharat

Firing In Sitamarhi SSB Camp : आपसातील वादातून जवानावर सहकाऱ्याचा गोळीबार, भारत नेपाळ सीमेवर होते तैनात - भारत नेपाळ सीमेवर तैनात

बिहारच्या सीतामढी सैनिक छावणीतील जवानाने सहकाऱ्यावर गोळीबार केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. धर्मेंद्र जोलोजा असे त्या जखमी जवानाचे नाव असून त्याच्यावर सीतामढीच्या सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Firing In Sitamarhi SSB Camp
जखमी जवान
author img

By

Published : Feb 13, 2023, 6:14 PM IST

सीतामढी : बिहारमधील सीतामढी सैनिक छावणीत आपसातील वादातून जावानावर सहकाऱ्याने गोळीबार केल्याने खळबळ उडाली. धर्मेंद्र जोलोजा असे जखमी जवानाचे नाव असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर थाना सिंह मीणा असे गोळी मारणाऱ्या जवानाचे नाव आहे. ही घटना आज सकाळी सीतामढी सैनिक छावणीत घडल्याची प्रथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. हे दोन्ही जवान भारत नेपाळ सीमेवर तैनात होते. गंभीर जखमी जवानावर सीतामढी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपसातील वादातून झाला गोळीबार : सोमवारी सकाळी सीतामढी छावणीतील दोन सहकाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यामुळे छावणीतील धर्मेंद्र जोलोजा या एसएसबीच्या 51 व्या बटालियनमध्ये कार्यरत जवानाला त्याच्या सहकारी थाना सिंह मीणाने गोळी मारली. त्यामुळे गोळीबार झाल्याने धर्मेंद्र हा गंभीर झाला. त्याला तात्काळ सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. धर्मेंद्रच्या जांघेत गोळी लागल्याने तो गंभीर झाला आहे.

दारू पिण्यावरुन वाद झाल्याची चर्चा : थाना सिंह मीणा आणि धर्मेंद्र जोलोजा या दोघांमध्ये सोमवारी सकाळीच वाद सुरू झाला. या वादातून राजस्थानाच्या थाना सिंहने धर्मेंद्रला गोळी मारली. ही गोळी धर्मेंद्रच्या जांघेतून आरपार गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे धर्मेंद्रला तात्काळ सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या प्रकरणी एसएसबी बटालियनच्या 51 व्या तुकडीचे कमांडन्ट काहीही बोलण्यास तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत आणि नेपाळ सीमेवर असलेल्या नरकटीया बीओपीवर ही गदोळीबाराची घटना घडल्याने जिल्हा पोौलीस दलाच्या अधिकाऱ्यांनीही यावर बोलणे टाळले आहे.

एसएसबी जवान धोक्याबाहेर : सीतामढी सैनिक छावणीतील जवानाने आपल्या सहकाऱ्यावर गोळीबार केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. धर्मेंद्र जोलोजा या जवानाच्या जांघेत गोळी लागली आहे. त्यामुळे त्याला सीतामढी सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या जवानाची प्रकृती आला धोक्याबाहेर आहे. डॉक्टर धर्मेंद्र जोलोजा याच्यावर उपचार करत असून त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या प्रकरणावर एसएसबीच्या कमांडन्टसह अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. दुसरीकडे भारत आणि नेपाळच्या सीमेवर ही घटना घडल्याने जिल्हा पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनीही यावर बोलणे टाळले आहे.

हेही वाचा - Valentines Day : व्हॅलेंटाईन डे निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींना विद्यार्थी देणार सोन्याच्या गुलाबाचा पुष्पगुच्छ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.