नवी दिल्ली - दिल्ली उपनगरी मुंडका भागात रात्री उशिरा लाकडाच्या गोदामात भीषण आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाची सुमारे 12 वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. बऱ्याच प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
दिल्ली फायर सर्व्हिसचे संचालक अतुल गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. गोडाऊनला लागलेल्या आगीची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथे अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
दरम्यान, दिवाळीच्या काळात आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन दिवसांत गुजरात, मुंबई, रायगड आदी ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहे.
हेही वाचा- मालवणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन व्हिडीओ चित्रण; तीन आरोपींना अटक