हैदराबाद Fire in Hyderabad : हैदराबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडलीय. नामपल्ली भागात एका अपार्टमेंटला लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा मृत्यू झालाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामपल्ली पोलीस स्टेशन हद्दीतील बाजार घाट इथं चार मजली अपार्टमेंटच्या खाली असलेल्या कार रिपेअरिंग गॅरेजमध्ये अचानक आग लागली. ही आग झपाट्यानं संपूर्ण अपार्टमेंटमध्ये पसरली. त्यातील लोकांना बाहेरही पडता आले नाही. या आगीत अडकलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला. तर अनेकांना वाचवण्यात यश आलंय.
-
Telangana: 6 dead, 3 injured as massive fire engulfs godown in Hyderabad
— ANI Digital (@ani_digital) November 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/PwepSMfMaA#Telangana #Hyderabad #Fire pic.twitter.com/z1kjyId0Ql
">Telangana: 6 dead, 3 injured as massive fire engulfs godown in Hyderabad
— ANI Digital (@ani_digital) November 13, 2023
Read @ANI Story | https://t.co/PwepSMfMaA#Telangana #Hyderabad #Fire pic.twitter.com/z1kjyId0QlTelangana: 6 dead, 3 injured as massive fire engulfs godown in Hyderabad
— ANI Digital (@ani_digital) November 13, 2023
Read @ANI Story | https://t.co/PwepSMfMaA#Telangana #Hyderabad #Fire pic.twitter.com/z1kjyId0Ql
इमारतीबाहेर अनेक वाहने जळून खाक : इमारतीत अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाचे जवान बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेरून पायऱ्या चढवून बाहेर काढण्यात आलंय. मात्र, इमारतीजवळच्या भक्कम ज्वाला वाढत आहेत. या अपघातात अनेक वाहनं जळून खाक झाली. तसंच परिसरातील अनेक दुचाकींना आग लागली. इमारतीबाहेर उभी असलेली कारही जळाली. कार आणि दुचाकी इमारतीत राहणाऱ्या लोकांची होती की दुरुस्तीसाठी पार्क केली होती हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आणली आटोक्यात : अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. अनेक प्रयत्नांनंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय. यानंतर इमारतीतून प्रचंड धुराचे लोट उठू लागले. घटनास्थळी स्थानिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, इमारतीच्या आतून पायऱ्यांचा वापर करुन त्यांना घराच्या खिडकीतून बाहेर काढण्यात आलंय. तसंच महिला व लहान मुलांनाही याच मार्गानं बाहेर काढण्यात आलं. अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. ही आग इतकी भीषण होती की आकाशात धुराचे लोट दूरवरूनही दिसत होते. या परिसरात इतरही अनेक घरे आहेत. मात्र, सध्यातरी जवळपासच्या घरांचे कोणतेही नुकसान झाल्याचं वृत्त नाही.
हेही वाचा :