झारखंड : धनबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली आहे. शहरातील जोडा फाटक परिसरात आगीची घटना घडली आहे. जोडा फाटक परिसरात असलेल्या आशीर्वाद टॉवर अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
-
14 people dead & 12 others are injured in the fire that broke out in an apartment in Dhanbad. Several people were in the apartment to attend a marriage function. Cause of the fire is still not known. We're focusing on rescue. Injured shifted to hospital: SSP Dhanbad Sanjiv Kumar
— ANI (@ANI) January 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">14 people dead & 12 others are injured in the fire that broke out in an apartment in Dhanbad. Several people were in the apartment to attend a marriage function. Cause of the fire is still not known. We're focusing on rescue. Injured shifted to hospital: SSP Dhanbad Sanjiv Kumar
— ANI (@ANI) January 31, 202314 people dead & 12 others are injured in the fire that broke out in an apartment in Dhanbad. Several people were in the apartment to attend a marriage function. Cause of the fire is still not known. We're focusing on rescue. Injured shifted to hospital: SSP Dhanbad Sanjiv Kumar
— ANI (@ANI) January 31, 2023
14 जणांचा मृत्यू : धनबाद शहरातील सर्वात वर्दळीच्या भागात आज संध्याकाळी उशिरा अपार्टमेंटमध्ये आग लागली. आगीमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. लोकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
13 मजली अपार्टमेंट : बँक मोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोडा फाटक रोडवर असलेल्या शक्ती मंदिराजवळील आशीर्वाद टॉवर अपार्टमेंटमध्ये अचानक भीषण आग लागली. आगीच्या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. 13 मजली अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शोक व्यक्त केला : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आशीर्वाद टॉवर अपार्टमेंटला लागलेल्या आगीमुळे झालेल्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. ही घटना हृदयद्रावक असल्याचे सांगितले. जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करत असून, अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत. मी स्वतः या प्रकरणाची चौकशी करत असल्याचेही ते या संदेशात म्हणाले आहेत.
-
Jharkhand CM Hemant Soren expresses condolences over the death of people due to fire in Dhanbad's Ashirwad Tower Apartment
— ANI (@ANI) January 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
"The district administration is working on a war footing and treatment is being provided to those injured in the accident," tweets Jharkhand CM Hemant Soren pic.twitter.com/k6eEdqUPG9
">Jharkhand CM Hemant Soren expresses condolences over the death of people due to fire in Dhanbad's Ashirwad Tower Apartment
— ANI (@ANI) January 31, 2023
"The district administration is working on a war footing and treatment is being provided to those injured in the accident," tweets Jharkhand CM Hemant Soren pic.twitter.com/k6eEdqUPG9Jharkhand CM Hemant Soren expresses condolences over the death of people due to fire in Dhanbad's Ashirwad Tower Apartment
— ANI (@ANI) January 31, 2023
"The district administration is working on a war footing and treatment is being provided to those injured in the accident," tweets Jharkhand CM Hemant Soren pic.twitter.com/k6eEdqUPG9
केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी शोक व्यक्त केला : केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी धनबादमधील आशीर्वाद टॉवर अपार्टमेंटला लागलेल्या भीषण आगीत डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याबद्दल शोक व्यक्त केला. ट्विट करून त्यांनी मृतांच्या आत्म्याला शांती आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी ईश्वराला प्रार्थना केली आहे.
भीषण आग : आशीर्वाद टॉवर अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. आगीमुळे गोंधळ उडाला. आग आणि धुराच्या लोटामुळे येथे राहणारे लोक मोठ्या प्रमाणात घाबरले आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आगिवर नियंत्रण मिळवले. पण, आगीच्या ज्वाला एवढ्या भीषण होत्या की, अग्निशमन दलाच्या जवानांनाही आग विझवण्यासाठी खूप प्रयत्न सुरू केले. या भीषण आगीत एक मुलगी आणि एका महिलेसह 14 जणांचा मृत्यू झाला. तर, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
हेही वाचा : माजी कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचे निधन