ETV Bharat / bharat

गुजरातमधील रुग्णालयाला आग; सुदैवाने जीवीतहानी नाही - वडोदरा रुग्णालय आग

मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णालयात १७ कोरोना रुग्णांवरही उपचार सुरू होते. आगीची माहिती मिळताच, या रुग्णांसोबतच इतर रुग्णांनाही तातडीने नजीकच्या काही रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. वडोदराच्या जिल्हाधिकारी शालिनी अगरवाल यांनी याबाबत माहिती दिली..

massive Fire break out at Vijay Vallabh Hospital in Vadodara
गुजरातमधील रुग्णालयाला आग; सुदैवाने जीवीतहानी नाही
author img

By

Published : Mar 18, 2021, 3:05 AM IST

गांधीनगर : गुजरातच्या वडोदरामध्ये असलेल्यी विजय वल्लभ रुग्णालयाला बुधवारी रात्री आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दहा गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या रुग्णालयामध्ये एकूण २३ रुग्ण होते. या सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

गुजरातमधील रुग्णालयाला आग; सुदैवाने जीवीतहानी नाही

१७ कोरोना रुग्णांचा समावेश..

मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णालयात १७ कोरोना रुग्णांवरही उपचार सुरू होते. आगीची माहिती मिळताच, या रुग्णांसोबतच इतर रुग्णांनाही तातडीने नजीकच्या काही रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. वडोदराच्या जिल्हाधिकारी शालिनी अगरवाल यांनी याबाबत माहिती दिली.

आग आटोक्यात, जीवीतहानी नाही..

अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे ही आग आटोक्यात आली असून, यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती अगरवाल यांनी दिली.

हेही वाचा : चारच दिवसात शेअर बाजार गुंतवणुकदारांनी गमाविले ५.५ लाख कोटी!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.