नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या समाजांबाबतची वादग्रस्त ट्विट सोशल मीडियावरून व्हायरल झाली आहेत. याशिवाय काहींनी वादग्रस्त वक्तव्येही केली आहेत. त्यामुळे दोन समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी ( Delhi Police ) काही जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा ( Nupur Sharma ) यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
वादग्रस्त ट्विटमुळे पोलिस सतर्क - समाजात एकमेकांबाबत वादग्रस्त ट्विट करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढले आहे. सोशल मीडिवरही असेच वादग्रस्त मजकूर लिहीले जात आहेत. समाजात वाद निर्माण होण्याच्या शक्यतेने दिल्ली पोलिसांनी बुधवारी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये भाजपाने बाहेरचा रस्ता दाखविलेले नेता नवीन कुमार जिंदल, लेखिका सबा नकवी, हिंदू महासभेच्या पूजा शकून पांडेय, राजस्थानातील मौलाना मुफ्ती नदी आणि पीस पार्टीचे प्रवक्ते शादाब चौहान यांची नावे आहेत. लोकांच्या भावनांना ठेच पोहोचविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
नुपूर शर्मा आरोपी - सोशल मीडियाचा गैरवापर केल्याप्रकरणी काही जणांवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये भाजपातून निलंबित करण्यात आलेल्या नेत्या नुपूर शर्मा यांना आरोपी करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्या तक्रारीवरूनही एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय सातत्याने धमक्या मिळत असलेल्या नुपूर शर्मा यांना दिल्ली पोलिसांनी सुरक्षाही दिली आहे.
हेही वाचा -Uddhav Thackeray : भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यामुळे देशावर नामुष्की ओढावली.. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल