शिवपुरी (मध्यप्रदेश) - नामिबियन चित्त्यांना कुनो नॅशनल पार्क आवडत नाही असे दिसते. कारणही तसेच रंजक घडले आहे. तिथून आता आशा नावाची मादी चित्ता पळून गेली आहे. नामिबियाच्या चित्त्यांना कुनो नॅशनल पार्क आवडत नाही असेच यावरुन काही लोक म्हणत आहेत. आता मादी चित्ता आशा ही कुनो अभयारण्यातून पळून गेल्यानंतर ती शिवपुरी जिल्ह्यातील रहिवाशी भागात आढळून आल्याचे समजते.
नरेंद्र मोदी यांनी आशा नाव दिले - नर चित्ता पवन (ओव्हन) याला असेच बाहेर गेल्यानंतर पुन्हा परत आणण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच घटना घडली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आता आशा ही कुनो अभयारण्यातील मादी चित्ता राष्ट्रीय उद्यानातून निसटली आहे. ही तीच मादी चित्ता आहे जिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा नाव दिले होते. राष्ट्रीय उद्यानातून ती गुरुवारी सकाळी शिवपुरी जिल्ह्यातील निवासी भागात पोहोचली. जंगलातून शिवपुरी जिल्ह्यातील बैराड तहसील भागातील आनंदपूर गावात मादी चित्ता आशा आढलून आली आहे.
उद्यानाचे पथक घटनास्थळी - त्यानंतर वनविभाग आणि कुनो राष्ट्रीय उद्यानाचे पथक घटनास्थळी पोहोचले. तिची सुरक्षा आणि हालचालींवर लक्ष ठेवून हे पथक आहे. दुसरीकडे आशा मादी चिता कुनो राष्ट्रीय उद्यानातून बाहेर पडून निवासी परिसरात आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या मादी चित्ता आशाचा मुक्काम मोहरीच्या शेतात आहे. आनंदपूर आणि गाझीगढ या गावात ती असल्याचे सांगण्यात आले. जेथे मादी चित्ता आशा कापणी केलेल्या मोहरी पिका बसली आहे.
आशा कुनो येथून दुसऱ्यांदा पळून गेली - नामिबियन मादी चित्ता आशाने यापूर्वी 5 एप्रिल रोजी कुनो नॅशनल पार्क सोडले होते आणि ती श्योपूर जिल्ह्यातील विजयपूर तालुक्याच्या गावांमध्ये पोहोचली होती. तेथून 2 दिवसांनंतर आशा स्वतः कुनो राष्ट्रीय उद्यानात परतली होती. गुरुवारी पुन्हा एकदा मादी चिता आशा कुनो राष्ट्रीय उद्यानातून बाहेर पडून शिवपुरी जिल्ह्यातील वस्ती असलेल्या भागात पोहोचली असून वस्तीमध्ये चिता आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.