ETV Bharat / bharat

क्रुर बाप! पोटच्या मुलीवर वारंवार बलात्कार; कोर्टाकडून 106 वर्षाची शिक्षा - POCSO

केरळमधील एका विशेष जलदगती न्यायालयाने 2015 पासून आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत ( Father sentenced to 106 years ) अनेक गुन्ह्यांसाठी एका व्यक्तीला 106 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 2017 मध्ये वारंवार बलात्कार केल्याने मुलगी गरोदर राहिली होती.

फाईल फोटो
फाईल फोटो
author img

By

Published : May 11, 2022, 10:18 AM IST

Updated : May 11, 2022, 10:49 AM IST

तिरूवनंतपुरम - केरळमधील एका विशेष जलद न्यायालयाने एका व्यक्तीला आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत 106 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ( Raping Minor Girl In Kerala ) आरोपी वडील (2015)पासून आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करत होते. दरम्यान, पीडित मुलगी 2017 मध्ये गर्भवती देखील झाली होती. वडिलांना लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्यानुसार ( POCSO ) दोषी ठरवण्यात आले आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश उदयकुमार यांनी अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणे, तिला गर्भधारणा करणे, 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार करणे आणि आई-वडील किंवा नातेवाईकाने बलात्कार करणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी त्याला 25 वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायालयाने सांगितले की, शिक्षा एकाचवेळी चालेल आणि दोषींना 25 वर्षांची शिक्षा भोगावी लागेल. ( Father Raping To Minor Girl ) न्यायालयाने आरोपीला एकूण 17 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

राज्यातर्फे विशेष सरकारी वकील अजित थंकय्या यांनी सांगितले की, ही घटना (2017)मध्ये उघडकीस आली, जेव्हा मुलगी गरोदर राहिली. सुरुवातीला आई आणि पोलिसांनी विचारणा करूनही त्याने गुन्हेगार कोण हे उघड केले नाही. नंतर, जेव्हा तिला समुपदेशनासाठी बाल कल्याण केंद्रात (CWC) पाठवण्यात आले तेव्हा तिने उघड केले की तिचे वडील गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर बलात्कार करत आहेत. वडिलांना 2017 मध्ये अटक करण्यात आली होती. ते म्हणाले की, पीडितेच्या मुलाला CWC मार्फत दत्तक घेण्यासाठी ठेवण्यात आले होते.

हेही वाचा - Asani cyclone : 'असानी'चा धोका नाही! अनेक राज्यात पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

Last Updated : May 11, 2022, 10:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.