नेल्लोर (आंध्र प्रदेश) - तुम्ही हे मंदिर पाहिलं आहे का? हे कोण्या देवीचे मंदिर नाही, तर हे मंदिर एका बापाने आपल्या मुलीसाठी बांधलेले आहे! हा बाप आपल्या मृत मुलीला विसरू शकत नव्हता, म्हणून त्याने तिच्या आठवणीत हे मंदिर बांधले आहे. या मंदिरात दरवर्षी पूजा उत्सवही आयोजित केले जातात. हे मंदिर आंध्र प्रदेशच्या नेल्लोर येथील वेंकटचलम मंडळात आहे. (Father Built Temple Of Daughter).
रस्ता अपघातात झाला होता मृत्यू - गावातील चेंचय्या आणि लक्षम्मा यांना पाच मुले आहेत. चौथी मुलगी सुब्बलक्षम्मा. तिच्या जन्मानंतर कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्थिर झाले. पदवी पूर्ण झाल्यानंतर तिला वनखात्यात नोकरी मिळाली. मात्र 2011 मध्ये एका रस्ता अपघातात तिला आपला जीव गमवावा लागला. चेंचय्या म्हणाले की हे मंदिर सुब्बलक्ष्मीम्माच्या इच्छेनुसार बांधले गेले होते, जिने त्यांना स्वप्नात सांगितले होते. तेव्हापासून मंदिरात कन्येची मूर्ती बसवून पूजा केली जाते.