ETV Bharat / bharat

ट्रॉली नदीत पडून ९ जणांना जलसमाधी, भंडाऱ्याच्या जेवणाला जाणं बेतलं जीवावर - ट्रॉली नदीत पडून ९ जणांना जलसमाधी

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली धमोळा नदीत पडल्याची घटना घडली आहे. या अपघातात 9 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक भाविक बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे.

saharanpur tractor trolley overturned
saharanpur tractor trolley overturned
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 4:16 PM IST

सहारनपूर : उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील कोतवाली ग्रामीण भागात बुधवारी एक भीषण अपघात झाला. बुंदकी गावाजवळ एक ट्रॅक्टर ट्रॉली धामोळा नदीत पडली. त्यात 50 हून अधिक भाविक होते. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात येत आहेत.

सीएम योगींनी दिल्या आर्थिक मदतीच्या सूचना : या घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातातील जखमींना आर्थिक मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस पाणबुड्यांसह घटनास्थळी पोहोचले. या अपघातात एक भाविक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कंदुरीला (भंडारा) जात होते भाविक : सहारनपूरमध्ये जहरवीर गोगाजींची पूजा सुरू आहे. त्यामुळं भाविक जहरवीर गोगाजींच्या घरी कंदुरीला जात होते. गागलखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलेली गावातील ५० हून अधिक भाविक या ट्रॅक्टर ट्रॉलीत होते. त्याचवेळी हा अपघात झाला आहे. भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली नदीत उलटल्यानं एकच गोंधळ उडाला.

गुरुवारी आणखी पाच मृतदेह सापडले : भाविकांची ट्रॉली उलटल्याने हा अपघात झाल्याचं जिल्हाधिकारी डॉ. दिनेश चंद्र यांनी सांगितलं. बचाव पथक रात्रभर बेपत्ता भाविकांचा शोध घेत होतं. गुरुवारी आणखी 5 मृतदेह सापडले असून ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातात जखमी झालेल्या भाविकांवर उपचार सुरू आहेत.

वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल : ट्रॉली उलटल्यानं भाविकांचा आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. गावकऱ्यांनी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. ग्रामस्थांच्या माहितीवरून पोलीस पाणबुड्यांसह घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. दिनेश चंद्र, एसएसपी डॉ. विपिन टाडा हेही बचाव पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सर्व भाविक बिलालखेडी गावचे रहिवासी : एसपी देहत सागर जैन यांनी सांगितले की, बुधवारी सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे धामोळ्यात नदीला पूर आला होता. ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये बसलेले ग्रामस्थ नदीच्या उतारावर येताच ट्रॅक्टर-ट्रॉली नदीत कोसळली. अपघातानंतर बचाव कार्य करताना चार मृतदेह सापडले आहेत. गुरुवारी आणखी पाच मृतदेह सापडल्यानं मृतांची संख्या 9 वर गेली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले बिलाल खेडी गावचे रहिवासी होते, असे ते जैन म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.