ETV Bharat / bharat

VRS To Fat And Alcoholic Policemen : लठ्ठ, मद्यपी पोलिसांची आता खैर नाही, आसामचे मुख्यमंत्री सुरू करणार स्वेच्छा निवृत्ती योजना

आसाम पोलीस दलात तब्बल 4 हजार लठ्ठ आणि मद्यपी पोलीस असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी लठ्ठ आणि मद्यपी पोलिसांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना सुरू करण्याचे ठरवले आहे.

VRS To Fat And Alcoholic Policemen
संपादित छायाचित्र
author img

By

Published : May 1, 2023, 12:00 PM IST

गुवाहाटी : पोलीस दलातील जवानामध्ये अनेक जवान लठ्ठ आणि मद्यपी आहेत. मात्र आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी लठ्ठ आणि मद्यपी पोलिसांवर कारवाई करण्याची योजना सुरू करण्याचे घोषित केले आहे. आसाममध्ये स्मार्ट पोलीस ही संकल्पना कार्यान्वित करण्यासाठी स्वेच्छा सेवानिवृत्ती योजना ( व्हीआरएस ) सुरू करणार आहे. यासह मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत मंत्रीमंडळाचा विस्तार करणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

तीनशे पोलीस अधिकारी रडारवर : आसाम पोलीस दलातील तब्बल 300 पोलीस जवान लठ्ठ आणि मद्यपान करणारे असल्याची माहिती रविवारी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली. आसाम पोलिसांमध्ये 300 अधिकारी आणि पोलीस सवयीने दारू पितात. दारूने त्यांचे शरीर काम करत नसून स्थूल झाल्याचेही मुख्यमंत्री सरमा यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे सरकारी नियमानुसार त्यांना व्हीआरएस योजनेमध्ये पाठवण्यात येईल. त्यांना नियमित पगार मिळत राहील. त्यांच्या जागेवर नवीन तरुणांना प्रवेश करण्याची संधी मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गृहखात्याची तयारी सुरू : लठ्ठ पोलिसांना आणि मद्यपी पोलिसांना स्वेच्छा निवृत्ती देण्याची तयारी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सुमारे 300 पोलीस अधिकारी आणि जवानांना व्हीआरएस देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी गृहखात्याने तयारी सुरू केली आहे. अशा पोलिसांची ओळख पटवण्यासाठी सरकारच्या विशेष पथकाने आधीच प्रक्रिया सुरू केली आहे. आसाम पोलिसांमध्ये असे किमान 4 हजारहून अधिक अपात्र अधिकारी आणि जवान असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आसाम मंत्रिमंडळात फेरबदल : लोकसभा निवडणुकीपर्यंत मंत्रिमंडळात कोणताही बदल किंवा विस्तार होणार नाही. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी याबाबतची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला १० मे रोजी दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यामुळे राज्य सरकार आपला दोन वर्षांनिमित्त वर्धापन दिन साजरा करणार आहे. याबाबत 9 मे ते 11 मे पर्यंत तीन दिवसीय कार्यक्रम राज्यात राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे.

हेही वाचा - Priyanka Gandhi on PM Modi : प्रियांका गांधी यांनी मोदींना दिला सल्ला, म्हणाल्या - 'राहुलकडून शिका...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.