ETV Bharat / bharat

..तर २६ जानेवारीला दिल्लीमध्ये 'ट्रॅक्टर परेड' होईल; आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा इशारा - दिल्ली शेतकरी किसान परेड

एका महिन्याहून अधिक काळापासून शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू आहे. याठिकाणी ४० प्रमुख शेतकरी संघटनांसह देशभऱातील सुमारे ५०० शेतकरी संघटनांचे हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांच्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता निर्णायक वेळ आली असल्याचे म्हणत शेतकऱ्यांनी हा इशारा दिला.

Farmers warn for tractor march to Delhi march on R-Day
..तर प्रजासत्ताक दिनाला दिल्लीमध्ये ट्रॅक्टर परेड होईल; आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा इशारा
author img

By

Published : Jan 3, 2021, 3:12 PM IST

Updated : Jan 3, 2021, 3:35 PM IST

नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज ३९वा दिवस आहे. आतापर्यंत सरकार आणि शेतकऱ्यांमधील सर्व चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. यातच आता आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम्ही २६ जानेवारीला दिल्लीपर्यंत ट्रॅक्टर परेड काढू, असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

एका महिन्याहून अधिक काळापासून शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू आहे. याठिकाणी ४० प्रमुख शेतकरी संघटनांसह देशभऱातील सुमारे ५०० शेतकरी संघटनांचे हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांच्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता निर्णायक वेळ आली असल्याचे म्हणत शेतकऱ्यांनी हा इशारा दिला.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर होईल ही परेड..

शेतकरी नेते दर्शन पाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनाच्या दिल्लीमधील परेडनंतर ही शेतकऱ्यांची परेड सुरू होईल. याला 'किसान परेड' असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत.

सोमवारी होणार चर्चा..

आंदोलनकर्ते शेतकरी आणि सरकारमध्ये चार जानेवारीला चर्चेची आणखी एक फेरी पार पडणार आहे. या बैठकीदरम्यान सरकारने आपल्या कृषी कायदे मागे घेण्याच्या आणि एमएसपी लागू करण्याच्या मागण्या मान्य नाही केल्या, तर आंदोलन आणखी तीव्र करु असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.

आज आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू..

दरम्यान, दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या या आंदोलनात सहभागी असणाऱ्या आणखी एका शेतकऱ्याचा आज मृत्यू झाला आहे. पंजाबच्या फाजिल्का भागातील एका गावात राहणाऱ्या ५६ वर्षीय कश्मीर लाल यांचे आज निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ डिसेंबरला ते दिल्लीमध्ये पोहोचले होते. त्यानंतर ३१ डिसेंबरला हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते पुन्हा आंदोलनात सहभागी झाले, यादरम्यान त्यांना पुन्हा हृदयविकाराचा धक्का बसला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

थंडी-पावसातही सुरुये आंदोलन..

सध्या दिल्लीमध्ये थंडीची लाट आली असून, काही ठिकाणी पाऊसही सुरू आहे. मात्र, अशा हवामानातही आंदोलनकर्ते शेतकरी सीमांवरती ठाण मांडून बसले आहेत. कितीही विपरीत परिस्थिती असली, तरी आम्ही मागे हटणार नाही अशी या शेतकऱ्यांची भूमीका आहे.

हेही वाचा : DCGI कडून कोविशिल्ड आणि कॉव्हॅक्सिन लसींना मंजुरी

Last Updated : Jan 3, 2021, 3:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.