किमान आधारभूत किंमतीबाबत (एमएसपी) सरकार शेतकऱ्यांना लेखी आश्वासन देण्यास तयार.
'दिल्ली चलो' आंदोलनाचा १४वा दिवस; सरकारच्या प्रस्तावानंतर ठरणार पुढील रणनीती.. - शेतकरी आंदोलन
15:34 December 09
15:26 December 09
विरोधी पक्षांचे नेते आज कृषी कायद्यांबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.

12:31 December 09
सरकारकडून शेतकरी संघटनांना प्रस्ताव सुपूर्द..
अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे केंद्र सरकारने तीन कायद्यांमधील बदलांबाबतचा आपला प्रस्ताव शेतकरी संघटनांकडे सुपूर्द केला आहे. या प्रस्तावावर ४० संघटना मिळून चर्चा करणार आहेत, आणि त्यानुसार आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. काल शेतकरी नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. मात्र, या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. तसेच आज होणारी बैठकही रद्द करण्यात आली आहे.
12:22 December 09
मोदींनी आपला हट्ट सोडावा - दिग्विजय सिंह
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोदींनी आपला हट्ट सोडायला हवा. त्यांचा हट्ट ना शेतकऱ्यांसाठी चांगला आहे, ना देशासाठी. मोदींनी तात्काळ संसदेचे अधिवेशन बोलावून हे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे.
12:20 December 09
..तर २६ जानेवारी इथेच होईल साजरा
यापूर्वीच शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे, की निर्णय घेण्यासाठी महिने जरी लागले तरी आम्ही सीमेवर आंदोलन करतच राहू. गरज पडली तर २६ जानेवारीही आम्ही दिल्लीमध्येच साजरा करू. आंदोलनाला येताना शेतकरी पूर्ण तयारीने आले आहेत. त्यांच्याकडे कित्येक महिने पुरेल एवढे सामानही असल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
12:17 December 09
सीमेवरील शेतकऱ्यांची संख्या वाढतीच..
शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामधील चर्चेच्या फेऱ्या एकीकडे निष्फळ ठरत आहेत. तर, दुसरीकडे दिल्लीच्या सीमांवरील शेतकऱ्यांची संख्या वाढताना दिसून येत आहे. जास्तीत जास्त प्रमाणात शेतकरी या आंदोलनात आपला सहभाग नोंदवताना दिसून येत आहेत.
07:43 December 09
'दिल्ली चलो' आंदोलनाचा १४वा दिवस..
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज १४वा दिवस आहे. शेतकऱ्यांनी काल (८ डिसेंबर) पुकारलेल्या भारत बंदला देशभरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये आज होणार असलेली पूर्वनियोजित बैठकही रद्द करण्याचा निर्णय कृषी संघटनांनी घेतला आहे.
केंद्राच्या प्रस्तावानंतर ठरणार पुढील रणनीती..
भारतीय किसान सभेचे महासचिव हन्नान मोल्लाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाहांनी आज सरकारमार्फत काही लेखी प्रस्ताव देण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये सरकारने कायद्यामध्ये केलेल्या बदलांवर ४० शेतकरी संघटनांशी चर्चा केली जाईल. त्यानंतर आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यात येईल.