ETV Bharat / bharat

तोडगा नाहीच..! शेतकरी-कृषीमंत्र्यांची बैठक संपली, आता ५ डिसेंबरला पुन्हा भेटणार

Meeting between the farmers' leaders and the union government concluded on Tuesday, with another round of talks scheduled to be held on Thursday. The farmer unions had said they had rejected the government's offer to set up a committee and will continue their protest.

Farmers protest against agricultural bills LIVE Updates
शेतकरी आंदोलन : आज दिल्लीमध्ये चर्चेची चौथी फेरी, राज्यातही ठिकठिकाणी आंदोलने; पाहा LIVE अपडेट्स..
author img

By

Published : Dec 3, 2020, 7:28 AM IST

Updated : Dec 3, 2020, 10:25 PM IST

19:52 December 03

किमान आधारभूत किमतीला हात लावणार नाही

किमान आधारभूत किमतींना हात लावणार नाही. एमएसपीत कोणतेही बदल करण्यात येणार नाहीत, असे वक्तव्य केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले आहे. आज विज्ञान भवनात शेतकरी नेते आणि केंद्रीय कृषी मंत्र्याची बैठक झाली. त्यात काहीही तोडगा निघाला नाही. आता ५ डिसेंबरला पुन्हा बैठक होणार आहे.   

19:41 December 03

शेतकरी आणि कृषीमंत्र्यांची बैठक संपली असून अद्यापही बैठकीत तोडगा निघालेला नाही

दिल्लीतील विज्ञान भवनात सुरू असलेली शेतकरी आणि कृषीमंत्र्यांची बैठक संपली असून अद्यापही बैठकीत तोडगा निघालेला नाही. आता ५ डिसेंबरला पुन्हा बैठक होणार आहे. केंद्रीय कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. 

19:00 December 03

दिल्ली-उत्तर प्रदेशला जोडणारे महत्त्वाचे रस्ते बंद, सरकारसोबत शेतकऱ्यांची चर्चा अद्यापही सुरूच

15:50 December 03

दुपारच्या जेवणासाठी बैठक काही काळ स्थगित

विज्ञान भवन येथे शेतकरी नेते आणि केंद्र सरकामध्ये बैठक सुरू आहे. दरम्यान, दुपारच्या जेवणासाठी बैठक काही काळ थांबविण्यात आली आहे. यावेळी शेतकरी नेत्यांनी सरकारने देऊ केलेले चहा आणि जेवण नाकारले. आंदोलक शेतकऱ्यांनी स्वत: चे अन्न बरोबर आणले होते.   

15:12 December 03

खासदार सुखदेव सिंग धिंदसा पद्मभूषण पुरस्कार माघारी देणार

शिरोमणी अकाली दलचे (डेमोक्रॅटिक) प्रमुख आणि राज्यसभा खासदार सुखदेव सिंग धिंदसा यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारचा निषेध म्हणून पद्मभूषण पुरस्कार माघारी करण्याची घोषणा केली आहे.  

13:46 December 03

सरकारच्या हुकूमशाहीविरोधात रस्त्यावर या - चंद्रशेखर आझाद रावण

भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद रावण यांनी आज आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेतली. जर सरकार हुकूमशाही करत असेल, तर लोकांनी त्याच्या विरोधात रस्त्यांवर यायला हवे. आम्ही इथे शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत, आणि शेवटपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असू, असे रावण यावेळी म्हणाले.

13:30 December 03

प्रकाश सिंग बादलांनी पद्मविभूषण पुरस्कार केला परत..

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपला पद्मविभूषण पुरस्कार परत केला आहे. 

12:52 December 03

शेतकऱ्यांचे प्रश्न लवकर सोडवण्याची गृहमंत्र्यांना विनंती केली - कॅप्टन अमरिंदर सिंग

शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. यामध्ये माझी काहीही भूमिका नाही. कृषी कायद्यांना माझा विरोध मी केंद्रीय गृहमंत्र्यांना सांगितला आहे, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची मी त्यांना विनंतीही केली आहे. माझे राज्य, देशाची अर्थव्यवस्था आणि सुरक्षा या सर्वांवर हे परिणाम करते, त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा निघणे आवश्यक आहे असे कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले.

12:32 December 03

बैठकीला झाली सुरुवात..

Farmers protest against agricultural bills LIVE Updates
बैठकीला झाली सुरुवात..

शेतकरी नेत्यांचे ४० सदस्यीय शिष्टमंडळ आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या बैठकीस सुरुवात झाली आहे.

12:19 December 03

आजच्या बैठकीतून सकारात्मक तोडगा निघण्याची आशा - कृषीमंत्री

सरकार हे वेळोवेळी शेतकऱ्यांशी चर्चा करत आहे. आज या शेतकऱ्यांसोबत चर्चेची चौथी बैठक आहे. या बैठकीतून सकारात्मक तोडगा निघण्याची आशा आहे, असे मत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच अमित शाहांच्या निवासस्थानी बैठक पार पाडून बाहेर पडले आहेत.

12:16 December 03

शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष कराल तर आंदोलन आणखी चिघळेल - नवाब मलिक

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक म्हणाले, की केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करु नये. तसे केल्यास शेतकऱ्यांचे हे आंदोलन अधिकच चिघळू शकते, असे ते यावेळी म्हणाले. पाहा त्यांची संपूर्ण प्रतिक्रिया...

12:12 December 03

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग अमित शाहांच्या निवासस्थानी दाखल..

एकीकडे शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ कृषीमंत्र्यांसोबत बैठक करत असतानाच, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भेटणार आहेत. यासाठी ते अमित शाहांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

11:58 December 03

..तर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होणार शेतकरी..

आज होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांच्या बाजून निर्णय घेतला जाईल याबाबत आम्हाला आशा आहे. मात्र, तसे न झाल्यास २६ जानेवारीला दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये शेतकरी सहभागी होतील, असा इशारा शेतकरी नेते राकेश तिकट यांनी दिला आहे.

11:57 December 03

बैठकीसाठी ४० शेतकरी नेते उपस्थित..

केंद्रीय कृषीमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीसाठी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये सध्या ४० शेतकरी नेते उपस्थित आहेत.

11:36 December 03

कृषीमंत्र्यांसोबत बैठकीसाठी शेतकरी रवाना..

कृषीमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीसाठी शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ सिंघू सीमेवरुन रवाना झाले आहे. बैठकीमध्ये आपल्या मागण्या मान्य न झाल्यास सिंघू सीमा सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

09:52 December 03

सर्वांना बोलावत नाही तोपर्यंत चर्चा नाहीच..

केंद्र सरकार हे शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे, जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण ५०७ संघटनांना चर्चेसाठी बोलवत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही असे किसान मजदूर संघर्ष समितीचे सहसचिव एस. एस. सुभ्रण यांनी म्हटले.

07:15 December 03

शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेणार कृषीमंत्र्यांची भेट..

नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या दिल्ली चलो आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. आज शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेणार आहेत. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश तिकैत यांनी याबाबत माहिती दिली. यासोबतच, देशभरातील शेतकऱ्यांनी आता आंदोलनासाठी रस्त्यावर यायला हवं असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यापूर्वी मंगळवारी काही शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारशी चर्चा केली होती. ही बैठक सकारात्मक झाल्याचे तोमर यांनी म्हटले होते. यानंतर आज होणाऱ्या बैठकीत कृषी कायद्यांमधील ठराविक मुद्द्यांवर चर्चा व्हावी अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या या दिल्ली चलो आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीकडे रवाना होत आहेत. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसोबतच आता ओडिशा आणि मध्य प्रदेशचे शेतकरीही दिल्लीकडे कूच करत आहेत. या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही दिसत आहेत. राज्यमंत्री बच्चू कडूंनी आंदोलनासाठी दिल्लीला जाण्याचा इशारा दिला आहे. तर, स्वाभिमानी शेतकरी संघटनाही आज (गुरुवार) आत्मक्लेश आंदोलन करणार आहे.

Last Updated : Dec 3, 2020, 10:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.