ETV Bharat / bharat

अलवरच्या लक्ष्मणगडमध्ये पार पडली शेतकरी महापंचायत

अलवरच्या लक्ष्मणगड येथे पहिली शेतकरी महापंचायत पार पडली. यात शेतकरी नेते राकेश टिकैत व इतर शेतकरी नेते दाखल झाले.

शेतकरी आंदोलन
शेतकरी आंदोलन
author img

By

Published : Feb 11, 2021, 10:42 PM IST

अलवर - देशातील सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सातत्याने गती मिळत असून ते आणखी मजबूत होत आहे. शेतकरी नेत्यांच्यावतीने सरकारला घेराव घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेशसह देशातील विविध राज्यात शेतकरी नेते महापंचायत करीत आहेत. अलवरच्या लक्ष्मणगड येथे पहिली शेतकरी महापंचायत पार पडली. यात शेतकरी नेते राकेश टिकैत व इतर शेतकरी नेते दाखल झाले.

जोपर्यंत तीनही कृषी कायदे रद्द होत नाहीत. तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरूच राहिल, असे राकेश टिकैत म्हणाले. राजस्थानमधील शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी आलो आहे. यामुळे शेतकरी चळवळीला आणखी वेग येईल. सरकार शेतकरी आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु शेतकऱ्यांचे हिताचे रक्षण करण्यासाठी तीन कायदे रद्द करेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

वर्षभर मेहनत करून शेतकरी आपले पीक घेते. कधी पाऊस पडतो कधी कधी त्याचे पीक खराब होते, उरलेल्या पिकाला शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर लढण्याचा निर्धार आहे, असेही ते म्हणाले. 18 फेब्रुवारीपासून रेल्वे रोको आंदोलन सुरू होणार आहे. आंदोलनाला काय रुप द्यायचे आणि आंदोलन विविध मार्गांनी कसे करावे, हे निर्णय समिती ठरवेल. आंदोलन संपवण्याचा सरकारचा हेतू आहे. मात्र, कायदे रद्द होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा राकेश टिकैत यांनी सरकारला दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.