ETV Bharat / bharat

सिंघू सीमेवर आंदोलनात सहभाग घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

गेली दहा महिने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. दुसरीकडे सिंघू सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारला असतानाच शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

author img

By

Published : Sep 27, 2021, 7:20 PM IST

शेतकरी
शेतकरी

नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना सिंघू सीमेवर घडली सोमवारी घडल्याचे पोलिसांनी आहे. बाघेल राम असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मृत शेतकरी बाघेल राम हे पंजाबमधील खेला गावामधील रहिवाशी होते. ते कृती किसान युनियनचे सदस्य होते. कृती किसान युनियनचे सदस्य रघुवीर सिंग म्हणाले, की बाघेल राम यांना काही काळ बरे वाटत नव्हते. ते तंबुमध्ये विश्रांती घेत होते.

हेही वाचा-केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारला भारत बंद, गाझीयाबाद मार्ग बंद करणार

बाघेल यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. शेतकरी बाघेल यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृत्यू हा ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे निदान झाले. शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे गोंधळ झाल्याचे रिपोर्ट होते. मात्र, पोलिसांनी असे सर्व रिपोर्ट फेटाळून लावले आहे.

हेही वाचा-शेतकऱ्यांनी पुकारला भारत बंद; जाणून घ्या 'त्या' तिन्ही कृषी कायद्यांविषयी

दरम्यान, आजवर सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या 19 हून शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

संयुक्त किसान मोर्चाने आज पुकारला आहे भारत बंद

संयुक्त किसान मोर्चाने आज भारत बंद पुकारला आहे. या बंदला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांचा पाठिंबा आहे. या बंदचा परिणार मोठ्या प्रमाणात दिल्ली-गुरुग्राम बॉर्डरव दिसत आहे. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने या भागात मोठ्या प्रमाणात दिल्ली पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच, सुरक्षा दलातील जवानही या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीहून येणाऱ्या प्रत्येक गाडीची येथे कसून चौकशी केली जात आहे. आंदोलनाला दहा महिने उलटले आहेत. मात्र, सरकारने या शेतकऱ्यांच्या मागण्या काही मान्य केलेल्या नाहीत. किंवा त्यांच्याबाबत कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. या पार्श्वभूमीवर हे सर्व शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा-आज शेतकऱ्यांचा देशव्यापी संप, वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.