ETV Bharat / bharat

छत्तीसगडमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचे आढळले मृतदेह; तिघांना जाळून पिता-पुत्राची आत्महत्या? - दुर्ग सामुहिक आत्महत्या न्यूज

छत्तीसगडमध्ये एका कुटुंबातील पाच व्यक्तींनी आत्महत्या केली. दुर्ग जिल्ह्यातील बाथेना गावात शनिवारी ही घटना घडली. आर्थिक कारणांमुळे आत्महत्या करत असल्याची एक चिठ्ठी पोलिसांना घटनास्थळी सापडली आहे.

Dead Body
मृतदेह
author img

By

Published : Mar 7, 2021, 7:40 AM IST

Updated : Mar 7, 2021, 7:51 AM IST

रायपूर - छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील एका गावात पाच जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पाचही व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत. आर्थिक कारणांमुळे आत्महत्या करत असल्याची एक चिठ्ठी पोलिसांना घटनास्थळी सापडली आहे. पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बाथेना गावात शनिवारी ही घटना घडली. राम ब्रीज गायकवाड (वय 52) जानकीबाई गायकवाड (वय 47), मुलगा संजू (वय 24), मुलगी ज्योती (वय 21) आणि दुर्गा (वय 28), अशी मृतांची नावे आहेत.

घटनेची माहिती देताना पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा

आर्थिक कारणांमुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती -

या प्रकरणाची माहिती मिळाताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना सर्वप्रथम राम आणि संजू यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी दिली. पोलिसांनी आणखी तपास केला. राम यांच्या शेताजवळ आणखी तीन मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडले. त्यांची ओळख पटवली असता त्या राम गायकवाड यांच्या पत्नी आणि मुली असल्याचे समोर आले. त्यांच्या मृतदेहांजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. 'आर्थिक कारणांमुळे आम्ही आत्महत्या करत असून त्यासाठी कुणालाही जबाबदार ठरवू नये', असे त्यात लिहिले असल्याचे सिन्हा यांनी सांगितले.

राम आणि त्यांच्या मुलाने अगोदर घरातील तीन महिलांना मारले आणि धान्याच्या गंजीत टाकून त्याला आग लावली. नंतर दोघांनी स्वत: आत्महत्या केली असावी, असे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. आम्ही प्रत्येक बाजून या प्रकरणाचा तपास करत आहोत, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सिन्हा यांनी दिली.

गृहमंत्र्यांनी घेतली घटनेची दखल -

छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी याबाबत दुर्गच्या पोलीस अधीक्षक आणि महानिरीक्षकांकडून माहिती घेत लवकरात लवकर या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Last Updated : Mar 7, 2021, 7:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.