नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र ठेवण्याचा परवाना मिळाला आहे. एका टीव्ही चॅनेलवरील चर्चेदरम्यान शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर कथितपणे वादग्रस्त टिप्पणी केली. त्यानंतर बराच काळ वाद सुरू झाला. त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले. या वादग्रस्त विधानानंतर भारतीय जनता पक्षाने आपल्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यांना आता शस्त्र परवाना मंजूर करण्यात आला आहे.
काय होते संपूर्ण प्रकरण: 26 मार्च 2022 रोजी एका टीव्ही चॅनलवर नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झाला. अनेक मुस्लिम देशांनी याबाबत निषेधही नोंदवला होता. त्यानंतर सरकारने यासंदर्भात एक निवेदन जारी केले होते. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यापासून भाजपने स्वतःला दूर केले आणि त्यांना पक्षातून निलंबित केले. या मुद्द्यावर झालेल्या गदारोळानंतर, भाजपने त्यांच्या वक्तव्यापासून दूर राहून एक विधान जारी केले होते. त्यात आम्ही भाजप सर्व धर्मांचा आदर करत असून, कोणत्याही धर्माच्या आदरणीय लोकांचा अपमान स्वीकारत नाही, असे म्हटले होते.
बराच काळ सुरु होता वाद: भाजपमधून निलंबित झाल्यानंतर नुपूर शर्मा यांनी बिनशर्त आपले वक्तव्य मागे घेतले होते. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता असे त्यांनी म्हटले होते. एका टीव्ही चॅनलवरील चर्चेदरम्यान नुपूर शर्माने पैगंबर मुहम्मद यांच्यावर कथित वादग्रस्त टिप्पणी केली होती, त्यानंतर बराच काळ वाद सुरू होता. नुपूरला अनेक ठिकाणाहून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले. या वादग्रस्त विधानानंतर भारतीय जनता पक्षाने आपल्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यांच्याशिवाय दिल्ली युनिटचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
परवाना स्वसंरक्षणासाठी: भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नुपूर शर्माला शस्त्र ठेवण्याचा परवाना मिळाला आहे. दिल्ली पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की त्यांना हा परवाना स्वसंरक्षणासाठी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे नुपूर यांची पक्षातून हकालपट्टी होण्यापूर्वी भाजपच्या प्रवक्त्या होत्या. त्यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप केला होता, ज्याला देश-विदेशात सर्वत्र जोरदार विरोध झाला होता. यामुळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती.
हेही वाचा: उमेश कोल्हे यांची हत्या पैगंबर यांच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठी