पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज पूर्ण झाले असून 56.12 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. बिहारचे तख्त कोण राखणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारच्या निवडणुकांवर अंदाज वर्तविणारे 'एक्झिट पोल' येत आहेत. विविध एक्झिट पोलनुसार आरजेडीच्या नेतृत्वाखालील महागाठबंधनला सत्तेत येत असल्याचे दिसत आहे.
एबीपी-सीवोटर एक्झिट पोलनुसार -
नितीशकुमार यांच्या युतीला 104 ते 128 तर लालू आघाडीला 108 ते 131 जागा मिळू शकतात, चिराग पासवान यांना 1 ते 3 आणि इतरांना 4 ते 8 जागा मिळतील.
टाईम्स नाऊ एक्झिट पोलनुसार -
टाईम्स नाऊ एक्झिट पोलनुसार एनडीएला 116, तर महागठबंधनला 120 जागा मिळतील. तर लोजपाला 1 आणि इतर पक्षांना 6 जागा मिळतील.
10 नोव्हेंबरला लागणार निकाल -
बिहारमध्ये 243 सदस्य असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा 28 ऑक्टोबरला पार पडला. पहिल्या टप्प्यात 71 विधानसभा जागांसाठी 53.53% टक्के मतदान झाले. तर दुसरा टप्पा ३ नोव्हेंबरला पार पडला. दुसऱ्या टप्प्यात 94 जागांसाठी 53.51 मतदान झाले. तर शेवटच्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला म्हणजेच आज 15 जिल्ह्यातील 78 मतदारसंघात 56.12% मतदानाची नोंद झाली. या निवडणुकीचा निकाल तीन दिवसांनी म्हजेच 10 नोव्हेंबरला लागणार आहे. राजद हे काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या साथीने लढत असून भाजपा आणि जेडीयूसह इतर चार पक्ष त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत.