डेहराडून - उत्तराखंड हे भारताच्या उत्तरेकडील एक महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते. भाजपाकडून मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांची गच्छंती करण्यात आली असून उत्तराखंडची कमान आता तीरथ सिंह रावत यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. राज्याची निर्मिती झाल्यापासून गेल्या 21 वर्षांत फक्त एकाच मुख्यमंत्र्याने आपला कार्यकाळ पूर्ण केला.
उत्तर प्रदेशमधून विभाजन झाल्यावर 9 नोव्हेंबर 2000 साली उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे नित्यानंद स्वामी होते. ज्यांनी 11 महिने 20 दिवस मुख्यमंत्री पद सांभाळले. त्यानंतर भगतसिंह कोश्यारी हे चार महिन्यांसाठी मुख्यमंत्री झाले.
एकाच मुख्यमंत्र्याने कार्यकाळ पूर्ण केला -
2002 मध्ये निवडणूक घेतल्यानंतर काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी हे पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले. 2002 ते 2007 पर्यंत ते मुख्यमंत्री होते. 2007 मध्ये निवडणूक घेतल्यानंतर भाजपाचे भुवनचंद्र खंडुरी मुख्यमंत्री झाले. त्यांच्यानंतर पुन्हा रमेश पोखरियाल निशंक यांना मुख्यमंत्री करण्यात आले. 11 स्पटेंबर 2011 ला पुन्हा निशंक यांच्या राजीनाम्यानंतर खंडुरी मुख्यमंत्री झाले.
25 दिवस राष्ट्रपती राजवट -
2012 विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने विजय मिळवला. तेव्हा विजय बहुगुणा यांना मुख्यमंत्री करण्यात आले. बहुगुणा यांनी 22 महिने मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळला. त्यानंतर पुन्हा 34 महिन्यांसाठी हरीश रावत मुख्यमंत्री झाले. हरीश रावत यांच्याविरोधात पक्षाच्या नऊ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. ही राष्ट्रपती राजवट 25 दिवस होती. त्यानंतर पुन्हा न्यायालयाच्या आदेशानंतर हरीश रावत यांचे सरकार होते. 2017 विधानसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवत त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्री केलं. तर पुन्हा 47 महिने आणि 20 दिवस सत्तेत राहिल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. गेल्या वीस वर्षांमध्ये इथं 9 मुख्यमंत्री झाले आहेत. 25 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट
उत्तरांखड विधानसभा संख्याबळ -
70 सदस्यसंख्या असलेल्या उत्तराखंड विधानसभेत भाजपने 57 जागांवर विजय मिळवत काँग्रेसकडून सत्ता खेचून आणली. काँग्रेसला केवळ 11 जागांवर समाधान मानावं लागलं. आता आगामी विधानसभा निवडणूक 2022 मध्ये होईल. राज्यात सत्तेत येण्यासाठी 21 जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे.
हेही वाचा - तीरथसिंह रावत होतील उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री, आजच शपथविधी