नवी दिल्ली - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Former prime minister Manmohan Singh) यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती एम्सच्या अधिकाऱ्यांनी दिली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोह सिंग यांना बुधवारी ताप आला. ते अशक्तपणा जाणवत असल्याने बुधवारी दिल्ली एम्समध्ये दाखल झाले. एम्सच्या अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले, की त्यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्या प्लेटलेट्सची संख्या वाढत आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मनमोहन सिंग यांना रुग्णालयाच्या कार्डिओ-न्यूरो सेंटरमधील वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर नितीश नाईक यांच्या नेतृत्वाखाली ह्रदयरोग तज्ज्ञांचे पथक त्यांची देखभाल-देखरेख करत आहे.
मनमोहन सिंग यांच्या कुटुंबांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांवर टीका
केंद्रीय आरोग्य मंत्री मनुसख मांडविय हे मनमोहन सिंह यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गुरुवारी एम्समध्ये पोहोचले. तेव्हा त्यांच्यासोबत फोटोग्राफरही उपस्थित होता. त्यावरून मोठा वाद झाला आहे. परवानगीशिवाय फोटोग्राफर सोबत आणल्याने मनमोहन सिंग यांच्या कुटुंबियांनी केंद्रीय मंत्री मांडवीय यांच्यावर टीका केली आहे.
हेही वाचा-सिंघू सिमेवर तरुणाचा हात तोडला, पोलिसांच्या बॅरिकेड्सला अडकवला, निहंग शिखाला अटक
वडील हे प्राणिसंग्रहालयातील जनावर नाहीत-
मनमोहन सिंग यांच्या कन्या दमन सिंह यांनी एका माध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला. फोटोग्राफरसहित मंत्री रुममध्ये घुसल्याने त्यांच्या आई खूप त्रासलेल्या होत्या. फोटोग्राफरला बाहेर जाण्याचे सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले. माझे आई-वडील हे कठीण परिस्थितीशी सामना करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते वयोवृद्ध आहेत. प्राणीसंग्रहालयात ठेवलेले जनावर नाहीत.
हेही वाचा-आंध्र प्रदेशमधील बन्नी महोत्सवात काठ्यांची लढाईत 100 हून अधिक भाविक जखमी