नवी दिल्ली- राजधानीतील गुन्हे शाखेनं माजी नौदल कर्मचाऱ्याला सोमवारी रात्री अटक केली. गेल्या २० वर्षांपासून पोलिसांचा दुहेरी हत्यांकातील आरोपीचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू होता. दिल्लीमधील बवाना आणि टिळक मार्ग येथे दुहेरी हत्याकांड झालं होतं. या प्रकरणी आरोपीला २० वर्षानंतर अटक करण्यात आली. विशेष पोलीस आयुक्त रवींद्र सिंह यादव यांच्या माहितीनुसार आरोपी हा ६३ वर्षीय असून त्यानं भारतीय नौदलात १५ वर्षे सेवा बजाविली आहे.
- पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीला जोधपूरमध्ये मृत घोषित करण्यात आलं. खुनाच्या आरोपातील अटकेपासून वाचण्यासाठी आरोपी हा नाव बदलून राहत होता. एवढचं नव्हेतर आरोपीनं बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्डही तयार बनवून घेतलं. पोलीस उपायुक्त अंकित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं त्याला अटक केली.
तयार केले बनावट पॅनकार्ड व आधार कार्ड- अमन सिंह या नावानं आरोपी नवं आयुष्य जगत होता. स्वत: मृत असल्याचं दाखवत नौदलाकडून पेन्शन आणि इतर लाभ घेतल्याचं त्यानं पोलीस तपासात मान्य केलं. आरोपी हा ट्रक चालक म्हणून काम करत होता. त्यानं २००४ मे महिन्यात राजस्थानधील जोधपूर येथील ट्रक पेटवून दिली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेत आरोपीनं स्वत:चा मृत्यू झाल्याचं दाखवित पोलिसांची दिशाभूल केली. आजतागायत घटनेतील दुसऱ्या व्यक्तीची पोलिसांना ओळख पटली नाही.
२० वर्षानंतर कायदेशीर कारवाई- ट्रक अपघातात मृत्यू झाल्याचं भासवून आरोपीनं पत्नीला विमा कंपनीकडून विमा आणि नौदलाकडून पेन्शन मिळवून दिली. आरोपीनं भाऊ सुंदरलालच्या मदतीनं राजेश उर्फ खुशीराम नावाच्या व्यक्तीची हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. या प्रकरणात आरोपी सुंदरलालला अटक करण्यात आली. मात्र, नौदलाचा माजी कर्मचारी फरार होता. आरोपी हा पानीपतमधील समालखा येथील रहिवाशी आहे. आठवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो १९८२ मध्ये भारतीय नौसेनेत रुजू झाला. १५ वर्षे नोकरी करून १९९६ मध्ये नौदलातून निवृत्त झाला. दिल्लीच्या गुन्हे शाखेने राजस्थानच्या डांडियावर पोलिसांनी आरोपीच्या अटकेची माहिती कळविली आहे. आरोपीला २० वर्षानंतर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
हेही वाचा-