ETV Bharat / bharat

Goa Assembly Election 2022 : काँग्रेस नेत्यांच्या बंडानंतर कळंगुट मतदारसंघात चुरस - गोवा विधानसभा निवडणूक रणधुमाळी

कळंगुट मतदारसंघातून आपलं नशीब आजमावत असलेले भाजपाचे माजी आमदार मायकल लोबो यांनी पक्षाला रामराम केल्यानंतर काँग्रेसच्या गोटात सामील झाले. मात्र आता काँग्रेसच्या नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकवला असल्याने मायकल लोबो यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. कळंगुट मतदार संघातील मतदार नेहमीच एकाच पक्षाला संधी देत नाहीत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 8, 2022, 7:07 PM IST

पणजी - भाजपाचे दिग्गज नेते मायकल लोबो यांनी भाजपाला रामराम करत कळंगुट मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी बंड पुकारल्यानंतर या मतदारसंघात आता चांगलीच सुरस दिसते आहे. गोव्यातील कळंगुट समुद्रकिनारा हा अतिशय प्रसिद्ध आहे. पर्यटकांनी नेहमी गजबजलेला कळंगुट परिसर आता निवडणुकीच्या रणधुमाळीत तापला आहे. कळंगुट मतदारसंघातून आपलं नशीब आजमावत असलेले भाजपाचे माजी आमदार मायकल लोबो यांनी पक्षाला रामराम केल्यानंतर काँग्रेसच्या गोटात सामील झाले. मात्र आता काँग्रेसच्या नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकवला असल्याने मायकल लोबो यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. कळंगुट मतदार संघातील मतदार नेहमीच एकाच पक्षाला संधी देत नाहीत. दर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा यांची अदलाबदल होताना दिसते.

  • मतदार संघाची रचना

कळंगुट मतदारसंघात हडफडे नागवा, कांदोळी, कळंगुट आणि पर्रा या चार पंचायतींचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण पंचवीस हजार पाचशे मतदारांची नोंद झालेली आहे. यापैकी बारा हजार चारशे पुरुष तर १३ हजार शंभर महिला मतदार आहेत. या मतदारसंघातील आजवरचा इतिहास पाहता मायकल लोबो यांचे वजन जास्त आहे. या मतदार संघातील प्रस्थापितांना धक्का देत त्यांनी आपलं वलय निर्माण केले आहे.

  • लोबो यांच्याविरोधात सिक्वेरा

मायकल लोबो यांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेते नाराज झाले. प्रवेश दिल्याने आग्नेल फर्नांडिस, जोजफ सिक्वेरा आणि अन्थोनी मीनेजिस यांनी लोगोच्या विरोधात काम करण्याचा निर्णय घेतला. लोगो यांच्या रिक्त झालेल्या जागेवर भाजपाने काँग्रेसचे नेते जोजफ सिक्वेरा यांना फोडून उमेदवारी दिली. त्यामुळे या मतदारसंघातील काँग्रेस आणि भाजपाची लढत अत्यंत उत्सुक याची ठरणार आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार अनिल लाड यांनी व्यक्त केले. तर या दोन नेत्यांच्या विरोधात कळंगुट पंचायतीचे पंच सुदेश मयेकर हे आमच्या तिकिटावर रिंगणात उतरले आहेत.

  • कोण मारणार बाजी?

वास्तविक या मतदारसंघावर कोणत्या एका पक्षाचा वरचष्मा नाही. प्रत्येक वेळेला नव्या पक्षाला आणि उमेदवाराला या मतदारसंघाने पसंती दिली आहे. त्यामुळे यंदा या मतदारसंघावर कोण आपला दावा सिद्ध करतो, याबाबत उत्सुकता असणार आहे.

हेही वाचा - BJPs Manifesto For Goa : गोमंतकीय अर्थव्यवस्था करणार ५० अब्ज डॉलरची.. गोवेकरांसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.