वॉशिंग्टन : कोरोना संकटातून सावरत असलेल्या भारतात आर्थिक हालचाली सामान्य होण्याची चिन्हे दिसत असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे.
2021 मध्ये भारतासाठी 12.5 टक्के विकासदराचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून वर्तविण्यात आला आहे. नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी बोलताना मंगळवारी गीता गोपीनाथ यांनी भारतात आर्थिक हालचाली सामान्य होत असल्याचे संकेत गेल्या काही महिन्यांत मिळत असल्याचे म्हटले आहे. 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6.9 टक्क्यांनी वाढेल असाही अंदाजही आयएमएफकडून वर्तविण्यात आला. 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था विक्रमी आठ टक्क्यांनी घटली होती. 2021 साठी आधी वर्तविण्यात आलेल्या अंदाजाच्या तुलनेत किंचित सुधारणा दिसून येत आहे. ही सुधारणा केवळ एक टक्के इतकीच असल्याचे गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - 'नैतिकतेची जबाबदारी फक्त शिवसेना, राष्ट्रवादीचीच आहे का?'