ETV Bharat / bharat

तालिबान-अफगाणिस्तान संघर्ष : आतापर्यंत 400 नागरिकांना भारतात सुरक्षित आणलं - अफगाणिस्तान

आज सकाळी 168 जणांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान मायदेशी परतले. तर आतापर्यंत भारतीय हवाई दलाने काबूलमधून जवळपास 400 नागरिकांना भारतात आणलं आहे. यात 329 जण भारतीय नागरिक आहेत. तर इतर अफगाणिस्तानातील शिख आणि हिंदू नागरिक आहेत.

Evacuation from Afghanistan: India brings back close to 400 people in three flights
तालिबान-अफगाणिस्तान संघर्ष
author img

By

Published : Aug 22, 2021, 1:11 PM IST

नवी दिल्ली - अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेले असून तेथील परिस्थिती अत्यंत चिघळली आहे. अफगाणिस्तानात अनेक भारतीय नागरिक अडकले असून त्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारकडून 'वंदे भारत मिशन' राबवण्यात येत आहेत. आज सकाळी 168 जणांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान मायदेशी परतले. तर आतापर्यंत भारतीय हवाई दलाने काबूलमधून जवळपास 400 नागरिकांना भारतात आणलं आहे. यात 329 जण भारतीय नागरिक आहेत. तर इतर अफगाणिस्तानातील शिख आणि हिंदू नागरिक आहेत.

  • #WATCH | 168 passengers, including 107 Indian nationals, arrive at Hindon IAF base in Ghaziabad from Kabul, onboard Indian Air Force's C-17 aircraft

    Passengers are yet to come out of the airport as they will first undergo the #COVID19 RT-PCR test.#Afghanistan pic.twitter.com/x7At7oB8YK

    — ANI (@ANI) August 22, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आज सकाळी अफगाणिस्तानातून भारतीय हवाई दलाचे सी-17 विमान 168 जणांना घेऊन गाझियाबादमध्ये दाखल झाले आहे. यात 107 जण भारतीय नागरिक आहेत. तर उर्वरित अफगाणिस्तानातील शीख आणि हिंदू आहेत. यापूर्वी आयएएफच्या विमानाने 87 भारतीय आणि 2 नेपाळी नागरिकांना काबूलमधून तझाकिस्तानच्या दुशांबेमध्ये सोडले होते. तेथून त्यांना आपल्या विशेष विमानाने सुरक्षित भारतात आणलं. तालिबानच्या तावडीतून बाहेर आल्यावर नागरिक सुटकेचा निःश्वास सोडत आहेत. पण डोळ्यात भीतीही आहे. भारतीय मायदेशात आल्याने आनंदी आहेत.

  • #WATCH | Afghanistan's MP Narender Singh Khalsa breaks down as he reaches India from Kabul.

    "I feel like crying...Everything that was built in the last 20 years is now finished. It's zero now," he says. pic.twitter.com/R4Cti5MCMv

अमेरिका आणि नाटोच्या विमानांनी 135 भारतीयांना काबूलमधून दोहाला सोडले होते. दोहामधून भारताच्या विशेष विमानाने दिल्लीत आणण्यात आले. भारताने अमेरिका, कतार, तझाकिस्तान आणि इतर अनेक मित्र देशांशी समन्वय साधून निर्वासन मोहिमा पार पाडल्या आहेत. सर्वांत पहिल्या खेपेत गेल्या सोमवारी भारताने काबूलमधून 40 जणांना भारतात आणलं होतं. यात दुतवासातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तर दुसऱ्या खेपेत भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानाने मंगळवारी 150 नागरिकांना सुरक्षित भारतात आणलं.

काबूलमधून सर्व भारतीयांना सुरक्षित आणण्यावर लक्ष -

अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्यदल मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर तालिबानींनी अफगाणिस्तानवर सत्ता मिळविली. अफगाणिस्तानची सत्ता तालिबान्यांच्या हातात गेल्यानंतर तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. 20 वर्षांपूर्वीची परिस्थिती पुन्हा दिसू लागली आहे. तालिबानने अफगाणिस्तानमधील बहुतांश सर्व मोठी गावे आणि शहरांसह काबुल ताब्यात घेतले आहे. काबुलमधून सर्व भारतीयांना सुरक्षित आणण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. तालिबान्यांच्या दहशतीमुळे अनेक जण मिळेल त्या मार्गाने देश सोडून जात आहेत.

तालिबान्यांनी ताब्यात घेतले होते भारतीय -

तालिबानींनी भारतीय नागरिकांच्या गटाला थांबवून काबुल विमानतळानजीक अज्ञात ठिकाणी शनिवारी नेले होते. तालिबानी दहशतवाद्यांनी भारतीयांचे अपहरण केल्याचे एका पोर्टलने म्हटले होते. मात्र, तालिबानी दहशतवाद्यांनी हे वृत्त फेटाळले होते. भारतीय सुरक्षित असल्याचे तालिबानकडून सांगण्यात आले. तालिबानी दहशतवाद्यांनी काही भारतीयांना व्हेरिफिकेशन आणि प्रवासाच्या कागदपत्राबाबत विचारणा केली. त्यानंतर भारतीयांची सुटका करण्यात आली.

हेही वाचा - 'तालिबानवर भारत विश्वास ठेवू शकत नाही, wait and watch ची भूमिका घ्यावी' - तज्ञ

हेही वाचा - तालिबानींनी ताब्यात घेतलेल्या भारतीयांची केली सुटका; नागरिक विमानतळाच्या दिशेने रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.