ETV Bharat / bharat

देशातील 'या' कोरोना वॉरिअर्सने करून दिले माणूसकीचे दर्शन; त्यांची धाडसी कामगिरी एकदा वाचाच - Corona Warrior Sandeep kale News ETV India

देशात कोरोनाचा उद्रेक वाढतच चालला आहे. कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढतच असून मृतांच्या आकड्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. अशात काही नागरिकांनी धाडस आणि माणूसकीचे दर्शन करून दिले. कोरोनाच्या संकट काळात विशेष कामगिरी करून या नागरिकांनी सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केले. या नागरिकांबाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा विशेष आढावा.

Corona Warriors work ETV bharat Review
कोरोना वॉरिअर संदिप काळे बातमी ईटीव्ही भारत
author img

By

Published : Apr 28, 2021, 2:40 AM IST

हैदराबाद - कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. यात दररोज ३ लाखांवर कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. या दरम्यान कुठे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे, तर कुठे उपचार मिळत नसल्याने रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे. ठिक ठिकाणांहून मृतांच्या कुटुंबीयांचा आक्रोश, त्यांचे दुख समोर येत आहे. देशातील ही स्थिती भयावह आहे. मात्र, अशातही काही नागरिकांनी धाडस आणि माणूसकीचे दर्शन करून दिले. कोरोनाच्या संकट काळात विशेष कामगिरी करून या नागरिकांनी सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केले. या नागरिकांबाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा विशेष आढावा.

हेही वाचा - व्हिडिओ कॉलवरच शुभमंगल सावधान, लग्नाच्या दिवशी वधू-वर ४५० किलोमीटर दूर

कोरोना वॉरिअर नंबर १ प्यारे खान

नागपूरला ऑक्सिजनची इफ्तारी, स्वखर्चाने ४०० टन ऑक्सिजनचा पुरवठा

नागपूर - सध्या संपूर्ण देशावर कोरोना महामारीचे संकट ओढवले आहे. यामध्ये राज्यासह नागपूर जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणा कोलमडली आहे. कुठे कोरोना प्रतिबंधक औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे, तर कुठे प्राणवायूची (ऑक्सिजन) कमतरता निर्माण झाली आहे. या भीषण परिस्थितीमध्ये कोरोनाबाधितांच्या मदतीला अनेक हात सरसावले आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे प्यारे खान.

शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यवसायाने ट्रान्सपोर्टर असलेल्या प्यारे खान हे संकटाच्या वेळी नागपूरच्या मदतीला धावून आले. ज्यावेळी नागपूरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला, त्यावेळी प्यारे खान यांनी स्वखर्चाने तब्बल ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील आणि जिल्ह्यातील शेकडो रुग्णालयांमध्ये पुरवला. याकरिता त्यांना ८५ लाखांचा खर्च आला. सध्या पवित्र रमजानचा महिना सुरू आहे, या महिन्यात माझ्या हातून पवित्र काम होत असल्याचे समाधान मला मिळत असल्याने त्याचे मोल मी घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्यारे खान यांचा जीवन संघर्ष

प्यारे खान यांचा जीवन संघर्ष अतिशय रोचक आहे. उमेदीच्या काळात प्यारे यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर संत्रे विकण्याचे काम केले. त्यानंतर आईने दिलेले काही दागिने विकून खान यांनी ऑटो रिक्षा चालवायला सुरवात केली. बँकेतून कर्ज काढून त्यांनी २००७ मध्ये स्वतःची ट्रान्सपोर्ट कंपनी सुरू केली. आज त्यांचे ट्रान्सपोर्टचे मोठे जाळे आहे. आपले शहर संकटात आहे आणि यामुळेच त्यांनी मदतीसाठी पुढे येण्याचा निर्णय घेतला. स्वतःकडून शक्य ती मदत करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. संपूर्ण देशात ऑक्सिजनची कमतरता असूनदेखील प्यारे खान यांनी ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था केली.

कोरोना वॉरिअर नंबर २ शहनवाज शेख

रुग्णांच्या मदतीला धावला 'ऑक्सिजन मॅन'

मुंबई - वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजचा तुडवडा आहे. त्यामुळे, ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचा दुर्देवी मृत्यू होत आहे. मात्र, राज्य शासन सुद्धा ऑक्सिजनसाठी हतबल दिसून येत आहे, अशा परिस्थिती मलाडमध्ये राहणारे शहनवाज शेख मात्र एका फोन कॉलवर रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करत आहे. त्यामुळे, सध्या 'ऑक्सिजन मॅन' चर्चेत आला आहे. आतापर्यंत त्यांनी साडेपाच हजार गरजू रुग्णांपर्यंत ऑक्सिजन सिलेंडर पोहचवले आहे.

आतापर्यंत ५ हजार ५०० ऑक्सिजन सिलेंडरची मदत

कोरोनामुळे सध्या राज्यातील वैद्यकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांना ऑक्सिजन अभावी मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. मात्र. या संकट काळात मुंबईतील मलाड परिसरातील शहनवाज शेख अर्थात 'ऑक्सिजन मॅन' कोविड रुग्णांच्या मदतीसाठी धावून आले आहे. त्यामुळे अनेकांचे प्राणसुद्धा वाचले आहेत. गेल्या वर्षीपासून आतापर्यंत साडे पाच हजार ऑक्सिजन सिलेंडर गरजू लोकांना वितरित करण्यात आले आहे. सध्या ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा पडत असल्याने शहनवाज यांना दररोज ५०० कॉल येत आहेत. तसेच, शक्य होईल तितकी मदत ते करण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोरोना वॉरिअर नंबर ३ संदिप काळे

वर्षभरापासून कोरोना योद्ध्यांना विनामुल्य रिक्षा सेवा

पुणे - कोरोना महामारीमुळे सध्या संपूर्ण जग ठप्प झाले. लॉकडाऊनसारखी स्थिती असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेरही पडता येत नाही. रिक्षा, टॅक्सी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वकाही बंद आहे, अशा परिस्थितीतही पोलीस, डॉक्टर, नर्स, यांना मात्र अजूनही रात्रंदिवस सेवा द्यावी लागत आहे. या कोरोना योद्धांच्या खांद्याला खांदा लावून पुण्यातील एक रिक्षावाला सेवा देत आहे. संदिप काळे, असे या रिक्षाचालकाचे नाव आहे.

500 हून अधिक नागरिकांना दिली सेवा

कोरोनामुळे सध्या पुणे शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे, शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी संदीप काळे हे मोफत रिक्षा सेवा पुरवतात. यापूर्वीच्या लॉकडाऊनदरम्यान त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात केली होती. ती आजतागायत सुरू आहे. आजपर्यंत त्यांनी 500 हून अधिक अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना रिक्षातून मोफत प्रवास देत त्यांची सेवा केली आहे.

कोरोना वॉरिअर नंबर ४ प्रवीण बुतडा

कोरोना रुग्णांना देत आहेत प्राणवायू

छत्तीसगड - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. रोज नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. देशातील सर्वात जास्त कोरोना प्रभावित जिल्ह्यांमध्ये राज्यातील दुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. असे असातना देखील जिल्ह्यातील प्रवीण बुतडा हे रुग्णांच्या मदतीला धाऊन आले. त्यांनी गरजू नागरिकांसाठी ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर विकत घेतले.

गेल्या वर्षी देखील कोरोना काळात प्रवीण यांनी ५ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर विकत घेऊन ते कोरोना रुग्णांच्या सेवेला लावले होते. मात्र, या वेळेस ऑक्सिजनची कमतरता वाढली, त्यामुळे प्रवीण यांनी २० नवे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर विकत घेतले व त्याद्वारे ते गरजू रुग्णांना प्राणवायू देत आहेत.

प्रवीण हे तंबू पुरवण्याचा व्यवसाय करतात. लग्न व इतर कार्यक्रमासाठी ते तंबू देतात. मात्र, कोरोना काळात त्यांच्या व्यवसायावर मंदी आली, तरी देखील ते गरजूंसाठी ऑक्सिजनची व्यवस्था करत आहेत. त्यांचे कार्यातून सर्वांना माणूसकीचे दर्शन होत आहे.

प्रवीण तीन रुग्णवाहिका देखील चालवतात

सध्या ऑक्सिजनच्या कमतरतेबरोबरच रुग्णवाहिका देखील कमी पडत आहे. त्यामुळे, प्रवीण हे गरजूंसाठी मोफत रुग्णवाहिका चालवत आहेत. प्रवीण यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने दोन वाहने मागवलीत व एक वाहन त्यांनी किरायाने घेऊन तिन्ही वाहनांना त्यांनी रुग्णवाहिकेमध्ये रुपांतरित केले. प्रवीण यांनी दोन वर्षांपूर्वी 'वेडिंग कॉर्पोरेशन' या नावाने नवे कार्यलय सुरू केले होते. मात्र, कोरोना काळात हे कार्यालय बंद पडले. मात्र, कोरोना रुग्णांना ऑक्सिजन आणि रुग्णवाहिकेचा पुरवठा सुरू करण्याचा विचार आला तेव्हा त्यांनी कार्यालयाचे नाव बदलून ते 'मिशन सेव दुर्ग' असे ठेवले. प्रवीण यांच्यानुसार त्यांच्याकडे ऑक्सिजन आणि रुग्णवाहिकेसाठी रोज २०० ते २५० नागरिकांचा फोन येतो. मात्र, संसाधनांच्या अभावामुळे ते फक्त ५० नागरिकांचीच मदत करू शकतात.

कोरोना वॉरिअर नंबर ५ रविंद्र आणि अरविंद

मित्राच्या कारला बनवले रुग्णवाहिका

छत्तीसड - रायपूर येथे देखील कोरोना विषाणूचा उद्रेक वाढला आहे. मात्र, येथे दोन मित्रांच्या साहस कार्याने जिल्ह्यातील नागरिकांची मने जिंकली आहेत. जिल्ह्यातील रविंद्र आणि अरविंद, हे दोन्ही मित्र आपल्या कारने कोरोनाबाधितांना रुग्णालयात पोहचवून देत आहेत.

रविंद्र सिंह क्षत्री यांनी शहरात लॉकडाऊन लागल्यानंतर समाज माध्यमांतून नागरिकांना मदत करण्यास सुरुवात केली. मात्र, नंतर उपचाराअभावी आणि रुग्णवाहिकेच्या कमतरतेमुळे रुग्णांच्या मृत्यूची बातमी येऊ लागली. लॉकडाऊनमुळे परिवहन सेवा बंद होती. अशात कारला रुग्णवाहिका बनवण्याचा विचार त्यांच्या मनात आला. रविंद्र यांचे मित्र प्रमोद साहू यांनी आपले वाहन त्यांना दिले, मात्र रविंद्र यांना वाहन चालवता येत नव्हते. अशात त्यांचे मित्र अरविंद सोनवानी मदतीला पुढे आले आणि आज दोघेही मिळून मित्राच्या वाहनाने गरजू रुग्णांना रुग्णालयात पोहचवत आहेत. त्यांच्या वाहनात रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडरची देखील व्यवस्था आहे. रविंद्र आणि अरविंद यांनी आपला मोबाईल क्रमांक समाज माध्यमांवर टाकला आहे. नागरिक त्यांना फोन करतात. १०० कि.मी च्या परिघातात ते मोफत रुग्णवाहिका सेवा देतात.

लॉकडाऊन काळात आई वारली. ती कोरोनाबाधित नव्हती, तरी देखील तिला रुग्णालयात नेण्याची व्यवस्था होऊ शकली नाही. या गोष्टीचा नेहमी मला खेद वाटतो, असे अरविंद यांनी सांगितले. मात्र, आता गरजूंना रुग्णालयात पोहचवून अरविंद आणि रविंद्र हे दोघेही आपल्या कार्यातून नागरिकांना माणूसकीची शिकवन देत आहेत. दोघेही कारने रुग्णांना रुग्णालयात पोहचवत आहेत. ते रुग्णावाहिकेसाठी देखील पैसे जमा करत आहेत. नागरिकांकडून मिळालेल्या मदतीतून त्यांनी या कामासाठी आतापर्यंत २ लाख रुपये जमा केले आहेत. नागरिकांनी या कार्यासाठी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

कोरोना वॉरियर नंबर ६ भगत राघव

२७ वर्षीय तरुण मृतदेहांना पोहचवतो स्मशानभूमीत

आंध्र प्रदेश - एकीकडे कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहांना हात लावण्यास त्यांचे नातेवाईक कचरत आहे. मात्र, अशात २७ वर्षीय भरत राघव हा रुग्णांच्या मृतदेहांना रुग्णालयात आणि घरातून स्मशानभूमीत पोहचवण्याचे धाडसी कार्य करत आहे. आंध्र प्रदेशातील एमबीएचा विद्यार्थी भरत राघव हा आतापर्यंत १०० पेक्षा अधिक कोरोनाबाधितांच्या मृतदेहांना अत्यंसंस्कारासाठी घेऊन गेला आहे.

बोम्मरू येथील रहिवाशी भरत राघव याची आई अंगणवाडी सेविका आहे. भगत याच्या वडिलांचा चार वर्षांपूर्वी एका गंभीर आजाराने मृत्यू झाला होता. रुग्णवाहिका न मिळाल्याने वडिलांना वाचवता आले नाही, याचे त्याला दुख वाटते. मात्र, सध्याच्या कोरोना परिस्थितीत त्याचे कार्य हे नागरिकांसमोर एक आदर्श ठरत आहे.

कोरोना वॉरिअर नंबर ६ सुरभी सोनी

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी करतेय अन्न पुरवठा

हिमांचल प्रदेश - पालमपूर येथील सुरभी सोनी ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी जेवनाची व्यवस्था करते. जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत आणि विलगीकरणात असल्याने स्वत:साठी जेवन बनवू शकत नाही, अशांना जेवन पुरवण्याचे कार्य सुरभी करते.

घरात स्वयंपाक बनवणारी व्यक्तीच जर कोरोनाबाधित झाली तर ती आणि तिच्या कुटुंबावर काय समस्या उद्भवणार, याची जाण ठेवून सुरभीने घरच्यांची समत्ती मिळवून अन्न पुरवठ्याचे काम हाती घेतले. सुरभीने समाज माध्यमातून गरजूंशी संपर्क साधने सुरू केले व नंतर त्यांच्या घरी अन्न पुरवठा करण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी दोन नागरिकांच्या घरी जेवन पोहचवले. सध्या ती ६ ते ८ नागरिकांच्या घरी दोन वेळचे जेवन पोहचवत आहे. जेवन बनवण्यात सुरभीची आई तिची मदत करते. पालमपूरच्या ७ ते ८ कि.मी च्या परिघातातील ज्या गरजूंना जेवनाची गरज आहे, त्यांनी संपर्क साधल्यास त्यांना अन्न पुरवठा केला जाईल, असे सुरभीने सांगितले. सुरभीचे हे कार्य खरोखरच वाखाण्याजोगे आहे.

हेही वाचा - काहीही निराधार गोष्टी छापू नका; 'दि ऑस्ट्रेलियन'ला भारताने खडसावले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.