- आज या घडामोडींवर असणार नजर
नाशिक - नाशिक येथे राणभाजी उत्सवाचे आयोजन होणार आहे. या उत्सवात कृषी मंत्री दादा भुसे आणि गृहमंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत.
ठाणे - माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे आज ठाण्यात एका नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत.
शिर्डी (अहमदनगर) - साईमंदिर खुले व्हावे म्हणून आणि ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज शिर्डीत श्रीसाई मंदिराला प्रदक्षिणा घालून साकडे फेरी आंदोलन केले जाणार.
मुंबई - कोरोना विषाणू प्रतिबंध लसीकरण मोहिमेंतर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आज (१२ ऑगस्ट) आणि शुक्रवारी 13 ऑगस्ट 2021 असे दोन दिवस लसीकरण बंद राहणार, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
- कालच्या महत्वाच्या बातम्या
मुंबई - कोविड रुग्णांची संख्या घटल्याने निर्बंध शिथिल केले असले तरी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी सावध आणि जबाबदारीने वागले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केले. कोविड रुग्णांसाठी दररोज ७०० मेट्रिक टनपेक्षा जास्त ऑक्सिजनची मागणी वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा सूचक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. सविस्तर वाचा..
मुंबई - राज्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने निर्बंधात पुन्हा शिथिलता आणली आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. तर रेस्टॉरेंट आणि हॉटेल्सना १५ ऑगस्टपासून रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. धार्मिक मंदिरे, मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहांना मात्र निर्बंध कायम राहतील, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सविस्तर वाचा..
नवी दिल्ली - ओबीसी यादीशी संबंधित 127 व्या घटना दुरुस्तीचे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले आहे. सविस्तर वाचा..
नवी दिल्ली - पावसाने ओढ दिल्याने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या राज्यातील बळीराजाच्या चिंतेत भर घालणारा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत देशभरात चांगल्या पावसाचे संकेत नसल्याचे हवामान विभागाने बुधवारी स्पष्ट केले. सविस्तर वाचा..
मुंबई - दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने खेळातील सर्वोच्च पुरस्कार 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' दिला जात होता. मात्र, तो पुरस्कार आता 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार' या नावाने दिला जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारने लगेच आयटी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणार्या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देणार असल्याचे जाहीर करून केंद्र सरकारला जशास तसे उत्तर दिले असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून मांडण्यात येत आहे. सविस्तर वाचा..
नागपूर - एखाद्या विवाहित महिलेच्या अंगावर चिठ्ठी फेकून कविता लिहून प्रेम व्यक्त करणे किंवा 'आय लव्ह यू' म्हणने हे कृत्य म्हणजे महिलेचा विनयभंगाचा गुन्हा असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी दिला. एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हा निर्णय देण्यात आला. या प्रकरणी आरोपीला दंड ठोठावत दंडाची रक्कम पीडित महिलेला देण्याचा निर्णय देण्यात आला आहे. सविस्तर वाचा..
नागपूर - अरुण गवळीला संचित रजा (पॅरोल) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केली आहे. न्यायालयाने गवळीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. कुटुंबीयांना भेटण्यासाठी अरुण गवळीने संचित रजेसाठी अर्ज केला होता. अरुण गवळी मुंबई येथील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्ये प्रकरणी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. सविस्तर वाचा..
मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक जिंकून देणारी महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने बुधवारी सचिन तेंडुलकरची भेट घेतली. यादरम्यान, मीराबाई चानूने तिने जिंकलेले रौप्य पदक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला दाखवला. सविस्तर वाचा..
नागपूर - वेगळ्या विदर्भाची मागणी करूनही लक्ष न देणारे मोदी आणि राज्य सरकार मेले म्हणत विदर्भ आंदोलन समितीने शोक व्यक्त केला. सरकारच्या निषेधार्थ युवा आघाडीने मुंडन करून श्रद्धांजली वाहिली. सविस्तर वाचा..
- वाचा चित्तवेधक बातमी -
हिमाचल प्रदेश दुर्घटना; किन्नौर येथील दरड कोसळल्याचे भयावह दृश्य..पाहा व्हिडिओ
- जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -
'या' राशीवाल्यांना आज नोकरीत बढती मिळण्याची शक्यता, वाचा..