ETV Bharat / bharat

विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे विदर्भ दौऱ्यावर, वाचा ईटीव्ही भारत टॉप न्यूज.. - State Cabinet Meeting

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल. ईटीवी भारत विशेष बातम्या व एक्सप्लेनरविषयी जाणून घ्या..

Neelam Gorhe Vidarbha tour
निलम गोर्हे विदर्भ दौरा
author img

By

Published : Aug 11, 2021, 5:32 AM IST

  • आज या घडामोडींवर असणार नजर

पुणे - एमआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ड्रायव्हरलेस कार तयार केली आहे. या कारचा अनावरण सोहळा आज होणार आहे.

नागपूर - विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे विदर्भ दौऱ्यावर.

मुंबई - आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता. पूर निवारणाचा आढावा घेतला जाण्याची शक्यता.

मुंबई - मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची आज बैठक होणार. कस्तुरबा रुग्णालयातील गॅस गळतीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.

  • कालच्या महत्वाच्या बातम्या

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ठेवल्याचे जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयावर काँग्रेस नेत्यांनी टीकाही केली होती. पण, आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना दिवंगत राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देणार असल्याची घोषणा केली आहे. हा पुरस्कार देण्याबाबतचा शासन निर्णय देखील राज्य सरकारने जारी केला आहे. सविस्तर वाचा..

मुंबई - कोरोनामुक्त ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर आता शहरी भागातीलही आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागातील पाचवी ते सातवीच्या शाळा 17 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या संबंधी आदेश काल शासनाने जारी केला. त्यामुळे, आता राज्यातील शाळांची घंटा वाजणार आहे. सविस्तर वाचा..

मुंबई - सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय मंत्रालयातून घेतले जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे ये-जा करत असतात. मंत्रालयात पास शिवाय प्रवेश दिला जात नाही. त्यातच कोरोनामुळे देखील सर्वांना प्रवेश दिला जात नाही. ज्यांना प्रवेश मिळतो त्यांची काटेकोर तपासणी केली जाते. त्याच मंत्रालयाच्या आवारात आता दारूच्या बाटल्या सापडू लागल्या आहेत. मंत्रालयात राजपात्रित अधिकाऱ्यांच्या उपहारगृहाच्या खालील बाजूस एक खोली आहे. तिथे दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. या बाटल्या मंत्रालयात गेल्याच कशा? त्या नेमक्या कुणाच्या? असा प्रश्न विचारला जात आहे. सविस्तर वाचा..

नवी दिल्ली - ओबीसींच्या यादी करण्याचे राज्यांना अधिकार देणाऱ्या 127 व्या घटना दुरुस्तीचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. या विधेयकाच्या दुरुस्तीला 385 खासदारांनी समर्थन दिले. या विधेयकाविरोधात एकाही खासदारांनी मत दिले नाही. सविस्तर वाचा..

मुंबई - 'एक डोस घेतलेल्यांना निदान चौथ्या सीटवर तरी बसू द्या', 'ज्यांनी लसीचा एक डोस घेतला त्यांना किमान गेटवर तरी लटकू द्या' अशा अनेक मिम्सचा पाऊस मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर पडला. कोरोना लसीचे दोन डोस घेणाऱ्या प्रवाशांना १५ ऑगस्ट २०२१ पासून लोकल प्रवासाची मुभा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (8 ऑगस्ट) केली. त्यानंतर प्रसिद्ध कॉमेडियन अतुल खत्री यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अतुल खत्री यांनी चक्क लसीकरण प्रमाणपत्र छापलेला पांढरा टी-शर्ट घातलेला फोटो ट्विट केला. हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. सविस्तर वाचा..

मुंबई - मुंबईच्या गणेशोत्सवामध्ये लालबागच्या राजाला एक विशेष मान आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. लालबागचा राजा हा लालबाग परिसरातील मसाला गल्ली भागात बसवला जातो. त्यामुळे, त्याची मूर्ती बाहेरून न आणता या ठिकाणीच घडवली जाते. त्यांच्या पाद्यपूजनाच्या सोहळ्यानंतर मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरूवात होते. काल लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला. सविस्तर वाचा..

नवी दिल्ली - युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील दिवसेंदिवस चिघळत चाललेली स्थिती पाहता इथे काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना तातडीने मायदेशी आणण्याचे निर्देश सरकारने कंपन्यांना दिले आहेत. याशिवाय मझार-ए-शरीफ इथून भारतीयांना घेऊन एक विशेष विमान मंगळवारी सायंकाळी राजधानी नवी दिल्लीच्या दिशेने उड्डाण करणार आहे. संघर्षग्रस्त अफगाणिस्तानात दिवसेंदिवस तालिबानचे वर्चस्व वाढत असून इथे संघर्षात हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. सविस्तर वाचा..

  • वाचा चित्तवेधक बातमी -

नारायणगाव (पुणे) - पुणे-नाशिक महामार्गावर एक बुलेट विनाचालक धावत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. भर दिवसा विनाचालक गाडी धावत असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्याने आपली बोटे तोंडात घातली. तर, या अनोख्या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पाहा व्हिडिओ..

  • जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

11 ऑगस्ट राशीभविष्य : आज 'या' राशीवाल्यांनी आपल्या आरोग्य विषयक तक्रारी येणार; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.