आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
- आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लखनऊ दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन कृषी कायदे रद्द केल्याच्या घोषणेनंतर ते आज लखनऊमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. चोख पोलीस बंदोबस्त या कार्यक्रमासाठी ठेवण्यात आला आहे.
- राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यावर आज सुनावणी
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल मानहानीच्या खटल्यावर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
- माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह फरार प्रकरणावर आज सुनावणी
सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्या वकिलांना ते कुठे आहेत, हे सांगायला सांगितले आहे. या प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे. परमबीर सिंह यांची सुरक्षेची मागणी करणारी याचिका पॉवर ऑफ अटर्नीच्या माध्यमातून दाखल करण्यात आली होती.
- विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज राज्यभर विद्यापीठे व कॉलेज कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक बंद
सातवा वेतन आयोग व अश्वाशित प्रगती योजनेसह इतर मागण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील अकृषी विद्यापीठाचे व महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी संपाचे हत्यार उपसले आहे. आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे.
- अमरावती हिंसाचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज भाजपाचे राज्यभर निषेध आंदोलन
अमरावतीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज भाजपाच्या वतीने राज्यभर निषेध आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे आंदोलन होणार आहे.
- आज राज्यात पावसाची शक्यता
पूर्व मध्य व पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हवेच्या वरच्या थरातील चक्राकार सिस्टिममधून द्रोणीय स्थितीजन्य परिस्थिती महाराष्ट्रपर्यंत आहे. परिणामी पुढील आज आणि उद्या राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी तीनही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. (Farm laws to be repealed) यासंबंधित विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळ बुधवारी मंजूरी देण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर हे विधेयक संसदेच्या आगामी अधिवेशनात मांडला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गुरुनानक जयंतीच्या पर्वावर राष्ट्रहितासाठी शेतकरी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. संसदेचे हिवाळी अधिवेशन 29नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. (parliament winter session from 29th november) कृषी कायदे रद्द करण्याच्या मागण्यासाठी मागील वर्षी नोव्हेंबरपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत संसदेत हे कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, अशी भूमिका या आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर आता सरकार तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठीचे विधेयक संसदेत सादर करेल.सविस्तर वाचा...
पुणे - शिवसेना पक्ष (shivsena) भाजपपासून दूर गेल्यानंतर आमचे हिंदुत्व कमी झालेले नाही. सावरकरांवर जेव्हा जेव्हा टीका (comment on savarkar) झाली तेव्हा आम्ही आवाज उठवली आहे. सावरकरांवर जहरी टीका झाल्यावर देखील शिवसेना रिअॅक्ट झालेली दिसत नाही. त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला ट्विट देखील केलेला नाही. काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा लांगूलचालनाची आहे आणि त्यांच्याबरोबर सरकार चालवायचे म्हणजे सेनेला तसे चालावे लागणार, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil criticize shivsena) यांनी केली.सविस्तर वाचा...
मुंबई - मुंबई क्राईम ब्रांचकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे (mumbai crime branch seized drug). गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने चेंबूर - शिवडी रोड येथून नायजेरियन ड्रग विक्रेत्याला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 200 ग्राम कोकेन आणि 5 किलो एमडी ड्रग जप्त केले आहे.सविस्तर वाचा...
गोंदिया:- राज्यात सर्वत्र शिक्षक पात्र परीक्षा सुरू असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आले होते. गोंदिया संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा येथील परीक्षा केंद्रावर खोली क्रमांक 5 मध्ये एका भावी शिक्षीकेने चक्क ब्लू टूथच्या माध्यमातून पेपर सोडवला. याचबरोबर परिक्षार्थीच्या ही कॉपी लक्षात आली.सविस्तर वाचा...
मुंबई - अमरावतील झालेल्या हिंसेनंतर दोन दिवस वातावरण कलुष्कीत झाले होते. आता अमरावती शांत झाली असून तिला शांतच राहू दे, अशा शब्दांत पालकमंत्री तथा महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खडसावले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर असून हिंसेबाबत भडकावू विधान केले होते. पालकमंत्री ठाकूर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांच्या विधानांचा चांगलाच समाचार घेतला.सविस्तर वाचा...
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून विलीनीकरणाच्या प्रमुख मुद्द्यावर एसटी कर्मचारी बेमुदत संपावर (ST Workers Strike Issue) गेले आहेत. या संपाला भाजपाने पाठिंबा दिला असून काही नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनाची भूमिका मांडताना, भाजपामध्ये दोन मतप्रवाह असल्याचे समोर आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.सविस्तर वाचा...
मुंबई - ‘भ्रमाचा भोपळा’, ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ५८ वर्षाच्या होत्या. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माधवी गोगटे यांचा जन्म ७ ऑगस्ट १९६४ रोजी झाला. त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. १९८७ मध्ये ‘सूत्रधार’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर १९९० मध्ये आलेल्या ‘घनचक्कर’ या चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष लोकप्रिय ठरली होती. ‘घनचक्कर’ या मराठी चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी ‘सत्वपरीक्षा’ या मराठी चित्रपटात उत्तम भूमिका साकारली. त्यांनी अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले. ‘भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची मराठी नाटकं तुफान गाजली. तसेच ‘घनचक्कर’ या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर प्रमुख भूमिका साकारली होती.सविस्तर वाचा...
पालघर - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) आवंढणी गावानजीक कार आणि कंटेनरमध्ये भीषण (car and container accident) अपघात घडला. यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 8 जण जखमी झाले असून त्यांना मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हेमंत तरे (वय -६०), सुषमा आरेकर (वय -३२), चालक राकेश तमोरे (वय-४२), सर्वज्ञा आरेकर (वय-०२) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. तर तृप्ती तामोरे (वय ३५), रमेश आरेकर (वय ५४) या दोघांची प्रकृती गंभीर असून हर्षद तरे (वय २७), भव्या आरेकर (वय ४), महेश आरेकर (वय ३९), सुनील तामोरे (वय ४०), आकाश पाटील (वय २५), जयेश तामोरे (वय ०३) हे सहाजण जखमी झाले आहेत.सविस्तर वाचा...
जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -