ETV Bharat / bharat

आज भारत-न्यूझीलंड T-20 मालिकेतील अंतिम सामना... वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर

काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

टॉप न्यूज
टॉप न्यूज
author img

By

Published : Nov 21, 2021, 5:55 AM IST

आज 'या' घडामोडींवर असणार नजर -

  • आज भारत - न्यूझीलंड T-20 मालिकेतील अंतिम सामना

सलग दोन सामन्यात विजय मिळविल्यानंतर आज तिसरा आणि अंतिम सामना कोलकाता येथे होणार आहे.

  • रखडलेली शिक्षक पात्रता परीक्षा आज होणार

राज्यात शिक्षक भरतीसाठी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा आज होणार आहे. आतापर्यंत ३ वेळा परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. याआधीच्या वेळापत्रकानुसार राज्यात ३० ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पण त्या दिवशी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक असल्याने परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली.

  • आज जागतिक दूरदर्शन दिन

प्रत्येक वर्षी २१ नोव्हेंबरला ‘वर्ल्ड टेलिव्हिजन डे’ किंवा आंतरराष्ट्रीय दूरदर्शन दिवस जगाच्या वेगवेगळ्या देशांत साजरा केला जातो. दूरदर्शन विविध मोठ्या आर्थिक आणि सामाजिक समस्यांवर लक्ष केंद्रित करते आणि संपूर्ण जगाचे ज्ञान वाढविण्यास मदत करते.

  • लातूरसह जळगाव जिल्हा बँके निवडणूकीसाठी आज मतदान

लातूर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.

  • आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. आजही राज्यातील काही सोलापूर, कोल्हापूरसह इतरही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

कालच्या महत्वाच्या बातम्या -

मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचा संपावरून राजकीय पोळी भाजा, पण पोळी जळणार नाही याची काळजी घ्या, अशी टीका परिवहन मंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षावर केली आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर तोडगा (Minister Anil Parab) काढण्यासाठी मुंबई सेंट्रलच्या एसटी मुख्यालयात परिवहन मंत्री अनिल परब (st workers strike) यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत महाराष्ट्र एसटी कनिष्ठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर आणि वरिष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते उपस्थित होते.सविस्तर वाचा...

जयपूर - राजस्थानच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Minister Ashok Gehlot) यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली आहे. या बैठकीत सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. ज्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढण्यात येणार आहे, त्यांचे राजीनामे राजभवनला पाठविण्यात येणार आहेत. इतर मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री अशोक गेहलोत स्वत:जवळ ठेवणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीला राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अजय माकन (Ajay Maken) हेदेखील उपस्थित राहिले. सविस्तर वाचा...

मुंबई - एसटीला शासनात विलीन करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांना 70 वर्षात जमले नाही ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी करून दाखवावे, अशी सूचना अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांनी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना केल्या आहेत. आज कामगार नेत्याबरोबर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुंबई सेंट्रल वरील एसटी मुख्यालयात बैठकीला बोलवले होते. या बैठकीत अनिल परब यांनी राज्याचे महाधिवक्ता यांच्याशी विलिनीकरणावर तातडीने चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे.सविस्तर वाचा...

नागपूर - त्रिपुरामध्ये कुठलीही घटना घडली नसताना कपोल कल्पित माहितीच्या आधारे अमरावतीमध्ये मोर्चे काढून हिंदूंच्या दुकानांत तोडफोड करण्यात आली (amravati violence), त्यावर हे तथाकथित सेक्युलर नेता का बोलत नाही? असा प्रश्न राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपने दंगे घडवल्याचा आरोपाला उत्तर दिले आहे. प्रश्न काय आहे आणि तो कोणी निर्माण केला यापासून दूर भटकून भाजपवर आरोप केल्याने असे प्रश्न कधी सुटणार नाही, असेही फडणवीस म्हणाले. ते नागपुरात विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.सविस्तर वाचा...

जालना - कोरोनाची लस घेण्यास नकारात्मकता दाखवणाऱ्या कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Kirtankar Nivruti Maharaj Indurikar) यांनी अखेर जालन्यातील बदनापूर तालुक्यातुन कोरोना लस घ्या, असे आवाहन त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून नागरिकांना केले आहे. जालना जिल्ह्यातून त्यांनी कोरोना लसीबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. इंदुरीकरांची हरीपाठाची एक आणि टोपेंच्या दोन कोरोना लस घ्या, कोरोना तणावमुक्त करा, असे आवाहन करत त्यांनी कोरोना जनजागृतीला सुरुवात केली. तर यावेळी त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांचे कौतुकही केले आहे. दरम्यान इंदुरीकर महाराज दिवसांतील 4 कीर्तनाच्या माध्यमातून कोरोना लस घेण्यासाठी जनजागृती करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.सविस्तर वाचा...

अहमदनगर - अनेकांच्या बलिदानानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. महात्मा गांधीजींचा सत्याग्राहाचा विचार होता. त्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. आजही महात्मा गांधीच्या विचारवरच देशभरात चळवळी होतात. त्यामुळे कंगनाची स्वातंत्र चळवळीवर बोलण्याची लायकी आहे का? अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अभिनेत्री कंगना रणौतवर टीका केली. (Balasaheb Thorat criticize kangana ranaut) भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले', अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रणौतने उधळली आहेत. यानतंर तिच्यावर अनेकांनी टीका केली.सविस्तर वाचा...

मुंबई - काळी मांजरे, कोल्हे लांडगे किती आले पण, वाघासमोर काही चालते का ? कितीही प्रयत्न केले तरी शिवसेनेचा झेंडा महानगरपालिकेवरून उतरवणे शक्य होणार नाही असा टोला संजय राऊत यांनी भाजपला (Sanjay Raut Slammed BJP in Vikroli) लगावला आहे. ते विक्रोळीतील एका कार्यक्रमात बोलत होते. मुंबईतील आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. विक्रोळीतील छत्रपती संभाजी महाराज मैदानाचा लोकापर्ण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार बॅटींग करत विरोधकांचा समाचार घेतला आहे.सविस्तर वाचा...

पणजी - 52 व्या चित्रपट महोत्सवाची नांदी (52nd Film Festival begins) झाली आहे. दिमाखदार सोहळ्यात 2021 (IFFI 2021 ) च्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर (Union Minister for Information and Broadcasting Anurag Singh Thakur) यांच्यासह दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.या सोहळ्यात भारतीय चित्रपट व्यक्तीमत्व पुरस्कार (Indian Film Personality Award) आणि सत्यजीत रे जीवन गौरव (Satyajit Ray Jeevan Gaurav) पुरस्कार प्रदान करण्यात आले. या महोत्सवातील सलमाची चित्रपट द किंग ऑफ ऑल द वर्ल्डचा ट्रेलर दाखवण्यात आला.सविस्तर वाचा...

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.