आज 'या' घडामोडींवर असणार नजर -
- संघ परिवाराच्या दोन दिवसीय समन्वय बैठकीचा आजचा दुसरा दिवस
- आज राज ठाकरे यांच्या दोन दिवसीय पुणे दौऱ्याचा दुसरा दिवस
- आजपासून सलग तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता
- आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन करणार
- आज राज्यभरात महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाची परीक्षा
कालच्या महत्त्वाच्या बातम्या -
- मुंबई - ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्याच्यादृष्टीने राजकीय मागासलेपण स्पष्ट करणारा इंपिरिकल डेटा लवकरात लवकर तयार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत आज(3 सप्टेंबर) यासंबंधीचे निर्देश राज्य मागास वर्ग आयोगास देण्यास एकमताने संमती दर्शवल्यात आली. सविस्तर वाचा...
- बुलडाणा - झोपेलेल्या शेतकऱ्यांना उठवू शकतो. मात्र, झोपेचे सोंग घेणाऱ्यांना कसे उठवणार? असा प्रश्न करत, इतर ठिकाणी शेतकऱ्यांना कायदा मान्य आहे. मग, आंदोलनाला बसलेले शेतकरी जास्त हुशार आहेत का? अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात ईडीने दाखल केलेली तक्रार रद्द करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सहाय्यक संजीव पालांडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. अनिल देशमुखांवर कारवाई करताना ईडीने आपल्यालाही या प्रकरणात गोवल्याचा असा आरोप करत संजीव पालांडे यांची बॉम्बे हायकोर्टात ईडीच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. सविस्तर वाचा...
- मुंबई - ओबीसी प्रर्वगाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसींवर अन्याय झाला आहे. याला केंद्रातील भाजपा सरकार कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची स्थिती म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे ते म्हणाले. सह्याद्री अतिथीगृहावरील सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सविस्तर वाचा...
- ठाणे - गृहनिर्माणमंत्री जिंतेद्र आव्हाड हे भिवंडी महापालिका आयुक्तांसोबत शहरातील विविध समस्यावर चर्चा करण्यासाठी आज पालिका मुख्यालयात आले होते. मात्र, मुख्य प्रवेश दारावरील सुरक्षेसाठी तैनाव करण्यात आलेल्या पोलिसांना धक्का देत राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयात गोंधळ घालत कोरोना नियमाला हरताळ फसला आहे. सविस्तर वाचा...
जाणून घ्या आजचे राशीभविष्य -