ETV Bharat / bharat

Bird Sanctuary In Raipur : वसाहतीत उभारले पक्षी अभयारण्य;पहा ईटीव्हीचा खास रिपोर्ट - Established a bird sanctuary

राजधानी रायपूरच्या खाजगी निवासी वसाहतीत सिंगापूरच्या धर्तीवर पक्षी अभयारण्य तयार करण्यात आले आहे. येथे 200 हून अधिक पक्षी आहेत. (Established a bird sanctuary in Raipur) यामध्ये वेगवेळ्या रंगाचे पक्षी आहेत. त्यांचा बागताना, त्यांचा चिवचिवाट एक वेगळाच आनंद देत असल्याची प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली आहे.

वसाहतीत उभारले पक्षी अभयारण्य
वसाहतीत उभारले पक्षी अभयारण्य
author img

By

Published : Apr 15, 2022, 12:34 PM IST

रायपुर: जीवन तणावमुक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे निसर्ग हा मार्ग आहे. सुंदर दुर्मिळ पक्ष्यांच्या सान्निध्यात वेळ घालवणे हा एक वेगळाच आनंद आहे. (Established a Bird Sanctuary Residential) हे लक्षात घेऊन रायपूरच्या निवासी वसाहतीत पक्षी अभयारण्य तयार करण्यात आले आहे. पक्षी अभयारण्यात 200 हून अधिक विदेशी पक्षी आहेत.

रायपूरमध्ये वसाहतीत उभारले पक्षी अभयारण्य

दर आठवड्याला डॉक्टरांना बोलावले जाते - हे पक्षी कोलकाता आणि चेन्नई येथून आयात करण्यात आले आहेत. समाजातील पक्षीप्रेमींना डोळ्यासमोर ठेवून पक्षी अभयारण्य उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे, येथे पक्ष्यांची विशेष काळजी घेतली जाते. पक्ष्यांची देखभाल, आरोग्य आणि आहार तपासण्यासाठी दर आठवड्याला डॉक्टरांना बोलावले जाते.

पक्षी छोट्या पिंजऱ्यात ठेवले जातात - येथे 7 ते 8 विदेशी प्रजातींचे पक्षी ठेवण्यात आले आहेत. यामध्ये लव्हबर्ड्स, गोल्डन अँड सिल्व्हर फिजंट, जावा, ऑस्ट्रेलियन पोपट, सिराज आणि कोहिनूर या प्रजातींचा समावेश आहे. पक्षी अभयारण्य बनवण्यापूर्वी पक्ष्यांना उडण्याचे स्वातंत्र्य मिळेल याची काळजी घेण्यात आली आहे. पश्चिम विहारमध्ये मोठे पक्षी ठेवण्यात आले आहेत. मोठे पक्षी त्यांना त्रास देऊ नयेत म्हणून लव्ह बर्ड्ससारखे छोटे पक्षी छोट्या पिंजऱ्यात ठेवले जातात.

सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते - सोसायटीचे लँड स्केपिंग मॅनेजर एम गांगुली म्हणाले, "सोसायटीतील लोकांच्या लक्षात घेऊन 15 हजार स्क्वेअर फूटमध्ये पक्षी अभयारण्य तयार केले आहे. पक्ष्यांच्या देखभालीसाठी काही लोकांना वेगळे ठेवण्यात आले आहे. हे केअरटेकर पक्ष्यांची काळजी घेतात. त्यामध्ये पक्षी काय खातात? कधी खावे या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते.

रायपूरचे वातावरण वेगळे आहे - सोसायटी क्लब हाऊसचे व्यवस्थापक श्याम सुंदर म्हणाले, पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे लोकांना सकारात्मकता येते. सकाळी आणि संध्याकाळी सोसायटीतील लोक पक्षी अभयारण्यात फिरण्यासाठी येतात. येत्या काळात पक्षी अभयारण्यात 500 पक्षी ठेवण्याची तयारी सुरू आहे. रायपूरचे वातावरण वेगळे आहे.

पक्ष्यांची संख्या निश्चितच वाढणार - रायपूरमध्ये गरमी आहे. विदेशी पक्ष्यांना अति उष्णतेमध्ये राहण्याची सवय नसते. त्यामुळे काही मोजकेच पक्षी ठेवण्यात आले आहेत. 6 टप्प्यात पक्ष्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. येत्या काळात पक्षी अभयारण्यात पक्ष्यांची संख्या निश्चितच वाढणार आहे.

हेही वाचा - Alia Ranbir Wedding Photos : पाहा, आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्याची खास क्षणचित्रे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.