श्रीनगर : लपलेल्या दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देण्यात आले ( jammu and Kashmir police ) आणि चकमक सुरू झाली. जम्मू झोनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADGP), मुकेश सिंग ( Jammu Kashmir DGP ) यांनी सांगितले. या ठिकाणी अतिरेकी ( two terrorists are suspected )असल्याच्या विशिष्ट माहितीच्या आधारे सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने परिसरात एक घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. सुरक्षा दलाने 7 एके-47 रायफल, 3 पिस्तूल आणि इतर दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. ट्रक मालकाची ओळख अद्याप पटलेली नाही, ट्रक जम्मूहून श्रीनगरला जात होता.
याआधी सोमवारी, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी पोलीस आणि भारतीय लष्कराच्या संयुक्त शोध मोहिमेत जम्मू आणि काश्मीरच्या पूंछमधील मेंढार उपविभागातून दहशतवाद्यांच्या एका ओव्हर-ग्राउंड वर्करला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल आणि काही दारूगोळा जप्त केला. पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेला दहशतवादी सहकारी सलवा येथील रहिवासी आहे आणि तयब खान असे त्याचे नाव आहे. त्याला जंगलाच्या परिसरातून येत असताना सुरक्षा दलांनी त्याला थांबण्यास सांगितले.
25 डिसेंबर रोजी दहशतवाद्यांचा गोळीबार 25 डिसेंबर रोजी शोपियानमध्ये एका नागरिकांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. शोपियानमधील हीरपोरा भागात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील शोपियानमधील बुरीहलन हीरपोरा भागातील रहिवासी वसीम अहमद वानी या नागरिकावर गोळीबार केल्याचे समोर आले आहे.
आम्हाला एका ट्रकची असामान्य हालचाल दिसली आणि आम्ही त्याचा पाठलाग केला. जम्मूमधील सिध्रा येथे ट्रक थांबवण्यात आला आणि चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. ट्रकचा शोध घेतला असता आत लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल गोळीबार करण्यात आल्याचे एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले.