ETV Bharat / bharat

South Kashmir Encounter : लष्कराची मोहीम फत्ते! तीन दशतवाद्यांचा खात्मा - जम्मू काश्मीरात अतिरेकी ठार

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील चंदगाम भागात बुधवारी पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ( Terrorist killed in South Kashmir ) झाली. या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. दक्षिण काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत झालेली ही दुसरी आणि 2022 या नव्या वर्षाच्या पहिल्या पाच दिवसांतील ही पाचवी चकमक आहे.

South Kashmir Encounter
लष्कर
author img

By

Published : Jan 5, 2022, 8:57 AM IST

Updated : Jan 5, 2022, 10:39 AM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीर खोऱ्यात शांततेला सुरुंग लावणाऱ्या दहशतवाद्यांचा नेस्तानाबूत करण्यासाठी सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील चंदगाम भागात बुधवारी पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ( Terrorist killed in South Kashmir ) झाली. या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. यासंदर्भात काश्मीर झोन पोलिसांनी त्यांच्या अधिकृत हँडलवर ट्विट केले आहे.

चंदगाम भागात अतिरेकी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला गुप्तचरांकडून मिळाली होती. माहितीच्या आधारे जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाने संयुक्त मोहीम राबवत संपूर्ण परिसराला वेढा घातला. यावेळी दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार करण्यात आला. याला जवानांनी योग्य प्रत्युत्तर दिले. जवानांनी केलेल्या गोळीबारात तीन अतिरेकी ठार झाले.

दक्षिण काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत झालेली ही दुसरी आणि 2022 या नव्या वर्षाच्या पहिल्या पाच दिवसांतील ही पाचवी चकमक आहे. या सर्व चकमकीत आजच्या तीनसह 8 अतिरेकी मारले गेले आहेत.

हेही वाचा -Atul Londhe Vs Dharmapal Meshram : भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक; पातळी सोडून एकमेकांवर टीका

Last Updated : Jan 5, 2022, 10:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.