श्रीनगर जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगर शहरातील नावहट्टा भागात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीला सुरुवात झाली Encounter between security forces and militants आहे. स्वतंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांशी चकमक सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांचे जवान त्याठिकाणी दाखल होत आहेत. Srinagar Encounter
पोलीस कर्मचारी जखमी याठिकाणी किती दहशतवादी आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र पोलीस आणि सीआरपीएफचे जवान दहशतवाद्यांना चोख प्रत्त्युत्तर देत आहेत. सुरू असलेल्या चकमकीत सीटी सरफराज अहमद रा. बटोटे रामबन नावाचा एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. एक दहशतवादीही जखमी झाला असून त्याचा शोध चालू आहे.
-
Srinagar, J&K | Encounter between security forces & terrorists in the Nowhatta area of Srinagar ongoing.
— ANI (@ANI) August 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/LzvYiETTuY
">Srinagar, J&K | Encounter between security forces & terrorists in the Nowhatta area of Srinagar ongoing.
— ANI (@ANI) August 14, 2022
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/LzvYiETTuYSrinagar, J&K | Encounter between security forces & terrorists in the Nowhatta area of Srinagar ongoing.
— ANI (@ANI) August 14, 2022
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/LzvYiETTuY
सुरक्षाव्यवस्था वाढवली सूत्रांचे म्हणणे आहे की संबंधित पोलीस अधिकाऱ्याला रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की चकमक सुरू असून संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. श्रीनगरच्या शेर काश्मीर क्रिकेट मैदानावर उद्या स्वातंत्र्यदिनाचा मोठा सोहळा आयोजित केला जात असून या मैदानापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर नोहटा आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी श्रीनगरसह इतर जिल्ह्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.