ETV Bharat / bharat

Jammu Kashmir Encounter : काश्मीरमध्ये सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक; तीन जवान जखमी

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कराचे तीन जवान जखमी झाले आहेत. या जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ही चकमक सुरू झाली होती.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Aug 4, 2023, 8:32 PM IST

कुलगाम(जम्मू-काश्मीर) : दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत राष्ट्रीय रायफल्सचे तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. पहारी जिल्ह्यातील हलान गावात ही चकमक झाली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी कुलगाम पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त दलावर गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय लष्करानेही सडेतोड उत्तर दिले आहे.

  • #WATCH | J&K | Encounter underway at high reaches of Halan forest area of Kulgam district. Army & Kulgam Police are carrying out the operation. Three jawans injured and evacuated to hospital for treatment.

    (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/4cAe93jiHe

    — ANI (@ANI) August 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तीन जवान जखमी - दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 34 राष्ट्रीय रायफल्सचे तीन जवान जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुलगाम परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार सुरू केला. या गोळीबारात लष्कराचे तीन जवान जखमी झाले आहेत.

कलम 370 रद्द करुन चार वर्ष पूर्ण - जम्मू-काश्मिरातून कलम 370 हटवून शनिवारी चार वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे हा सोहळा जम्मू-काश्मिरात साजरा केला जाणार आहे. त्याआधीच दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक झाली आहे. कलम 370 आणि 35 A रद्द केल्यानंतर दहशतवाद्यांकडून या निर्णयाला कायमच विरोध होत आला आहे.

सर्च ऑपरेशन सुरू - दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये शुक्रवारी दुपारी चकमक झाली. यानंतर दहशतवादी पळून गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस आणि भारतीय लष्यकराकडून संयुक्तरित्या या भागात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. परिसरातील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच जागोजागी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.