कोटा (राजस्थान) Elvish Yadav : 'बिग बॉस ओटीटी' विजेता आणि युट्यूबर एल्विश यादव एका रेव्ह पार्टीत सापाचं विष वापरल्यामुळे वादात सापडला आहे. त्यानंतर त्याच्यावर ३ नोव्हेंबरला नोएडामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.
पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान पकडलं : दरम्यान, शनिवारी (४ नोव्हेंबर) एल्विश यादवला राजस्थानच्या कोटा पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान पकडलं होतं. चौकशी करून नंतर त्याला पोलिसांनी सोडून दिलंय. या प्रकरणी रामगंज मंडीचे पोलीस उपअधीक्षक कैलाश चंद्र यांनी सांगितलं की, नोएडा पोलिसांनी एल्विश यादवविरुद्ध कोणतंही वॉरंट नसल्याचं सांगितलंय.
-
Rajasthan | YouTuber and Bigg Boss winner Elvish Yadav was stopped by police during routine checking in Kota
— ANI (@ANI) November 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Yesterday an FIR was registered against him and five others in Noida for allegedly supplying snake venom to rave parties.
(Pics source: Kota Police) pic.twitter.com/rY8fpMNGDn
">Rajasthan | YouTuber and Bigg Boss winner Elvish Yadav was stopped by police during routine checking in Kota
— ANI (@ANI) November 4, 2023
Yesterday an FIR was registered against him and five others in Noida for allegedly supplying snake venom to rave parties.
(Pics source: Kota Police) pic.twitter.com/rY8fpMNGDnRajasthan | YouTuber and Bigg Boss winner Elvish Yadav was stopped by police during routine checking in Kota
— ANI (@ANI) November 4, 2023
Yesterday an FIR was registered against him and five others in Noida for allegedly supplying snake venom to rave parties.
(Pics source: Kota Police) pic.twitter.com/rY8fpMNGDn
नोएडा पोलिसांकडून माहिती घेतली : पोलीस उपअधीक्षक कैलाश चंद्र म्हणाले की, या प्रकरणाची माहिती नोएडा पोलिसांकडून घेण्यात आली. नोएडा पोलिसांनी एल्विश यादवविरुद्ध कोणतंही वॉरंट नसल्याचं सांगितलं. त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात ४१ ची नोटीस देऊन चौकशी केली जाणार आहे. नोएडा पोलिसांकडून स्पष्टीकरण मिळाल्यानंतर पोलिसांनी एल्विश यादव आणि त्याच्यासोबतच्या सर्व लोकांना जाण्याची परवानगी दिली. यानंतर ते कोटामार्गे दिल्लीला रवाना झाले.
गाडीचा नंबर महाराष्ट्राचा होता : पोलीस उपअधीक्षक म्हणाले की, सुकेत पोलीस स्टेशननं निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील टोल प्लाझाजवळ नाकाबंदी केली होती. या नाकाबंदी दरम्यान सायंकाळी सहाच्या सुमारास झालावाडहून कोटाच्या दिशेने एक कार आली होती. या गाडीत ३ ते ४ जण होते. गाडीचा नंबर महाराष्ट्राचा होता. पोलिसांनी कार थांबवून कारमधील लोकांची चौकशी केली.
चौकशीनंतर जाऊ दिलं : पोलिसांनी सर्वांची नावं आणि पत्ते विचारले. दरम्यान, एका व्यक्तीनं स्वतःची ओळख यूट्यूबर एल्विश यादव अशी सांगितली. यानंतर नाकाबंदी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही माहिती सुकेत पोलिस स्टेशनचे अधिकारी विष्णू सिंह यांना दिली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. नोएडा पोलिसांशी बोलल्यानंतर पोलिसांनी एल्विश यादव आणि त्याच्यासोबत उपस्थित असलेल्या इतर लोकांना जाऊ दिलं.
हेही वाचा :
- Devendra Fadnavis : एल्विश यादव प्रकरणावरुन संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप; उपमुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर
- FIR against Elvish Yadav : एल्विश यादवच्या नसानसात भरलंय 'विष'? तस्करी प्रकरणी पाच साथीदारांसह 9 विषारी साप ताब्यात
- What is a rave party : ड्रग तस्करीत फसला एल्विश यादव, काय असते रेव्ह पार्टी आणि कसं सुरू झालं रेव्ह कल्चर?