ETV Bharat / bharat

Elon Musk News: संपत्तीत वाढ नाही तरीही एलॉन मस्क पुन्हा ठरला जगातील सर्वाधिक श्रीमंत, जाणून घ्या कारण - world Richest Person list update

पॅरिस ट्रेडिंगमध्ये अर्नॉल्टच्या एलव्हीएमएचचे शेअर्स 2.6 टक्क्यांनी घसरल्यानंतर बुधवारी एलॉन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठारला आहे. यापूर्वी बर्नार्ड अर्नॉल्ट हा जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरला आहे.

Elon Musk News
Elon Musk News
author img

By

Published : Jun 1, 2023, 1:08 PM IST

हैदराबाद: टेस्लाचा व ट्विटरचा मालक एलॉन मस्कने हा पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे बिरुद मिळविण्यात यशस्वी ठरला आहे. बुधवारी पॅरिस ट्रेडिंगमध्ये बर्नार्ड अर्नॉल्टच्या कंपनीचे शेअर घसरल्यानंतर त्याच्या संपत्तीत कमालीची घसरण झाली. त्याचा थेट फायदा म्हणजे टेस्लाचा सीईओ हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

टेस्लाचा सीईओ एलॉन मस्कने लक्झरी ब्रँडचा मालक असलेल्या बर्नार्ड अर्नॉल्टला मागे टाकले. जगातील 500 श्रीमंत लोकांच्या यादीत ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात दुसऱ्या क्रमांकावर होता. डिसेंबरमध्ये, टेक कंपन्यांना जागतिक मंदीची झळ सोसत असताना मस्कच्या संपत्तीत घसरण झाली होती. याच परिस्थितीत अर्नॉल्टच्या लक्झरी ब्रँड्सने महागाईतदेखील विक्रीतून मोठी उलाढाल केली होती. बर्नार्ड अर्नॉल्टकडे लुई व्हिटॉन, हेनेसी आणि फेंडी सारख्या लक्झरी ब्रँडची मालकी आहे.

एका दिवसात 11 अब्ज डॉलरचा चुराडा- नोव्हेंबर 2022 मध्ये टेस्लाच्या शेअरमध्ये घसरण झाली. तेव्हा त्याच्या शेअरची किंमत 167.87 डॉलरपर्यंत घसरली होती. आर्थिक वाढ मंदावण्याची चिन्हे असताना गुतंवणूकदारांचा लक्झरी क्षेत्रावरील विश्वास डळमळीत झाला आहे. एप्रिल 2023 पासून एलव्हीएमएच्या शेअर्समध्ये सुमारे 10 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे एका दिवसात अर्नॉल्ट्सच्या एकूण संपत्तीमधून सुमारे 11 अब्ज डॉलर कमी झाले आहेत.

दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? मस्कला टेस्लामुळे 2023 मध्ये 55.3 बिलियन डॉलरपेक्षा पेक्षा जास्त नफा झाला. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मस्कची एकूण संपत्ती आता सुमारे 192.3 अब्ज डॉलर इतकी आहे. अर्नॉल्टची एकूण संपत्ती सुमारे 186.6 अब्ज डॉलर आहेत. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती सुमारे 144 अब्ज डॉलर आहे.

हेही वाचा-

  1. Calls on Twitter : ट्विटर लवकरच सुरू करेल एनक्रिप्टेड मेसेजिंग आणि कॉल सुविधा; नवीन योजना केली तयार
  2. Elon Musk : एलॉन मस्क यांनी केली नवीन घोषणा; ट्विटर अनेक वर्षांपासून सक्रीय नसलेली खाती काढून टाकणार
  3. Scientists warn of AI dangers : शास्त्रज्ञ देतात एआयच्या धोक्यांबद्दल चेतावणी; परंतु उपायांवर सहमत नाहीत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.