चंदीगड- पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सरकार ( Punjabs Bhagwant Mann government ) भ्रष्टाचारापासून सावध असल्याचे दिसते. मुख्यमंत्री मान सरकारने अलीकडेच त्यांचे कॅबिनेट मंत्री विजय सिंगला ( case against minister Vijay Singla ) यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बाहेरचा रस्ता दाखवित गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी पंजाबमधील जनता भ्रष्टाचारापासून सावध असल्याचे दिसते. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एका मीटर रीडरला लोकांनी 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.
मीटर रीडर कर्मचाऱ्याच्या लाचखोरीचा संपूर्ण व्हिडिओ लोकांनी ( meter reader corruption video ) बनविला आहे. लोकांनी मीटर रीडरकडे पैसे परत करण्याची मागणी केली. ही संधी साधून तोंडात पैसे चघळण्याचा प्रयत्न ( swallows the bribe money ) केला. दरम्यान, लोकांनी त्याच्यावर पैसे काढण्यासाठी दबाव टाकला. त्यानंतर तोंडातील पैसे काढून रस्त्यावर टाकले. यावेळी मीटर रीडरलाही लोकांनी मारहाण केली आहे. लोकांनी मीटर रीडरला दिलेल्या लाचेची आधी नोटेची फोटोकॉपी केली. ही फोटोकॉपी दाखवून लोकांनी मीटर रीडरकडून पैसे वसूल केले.
हेही वाचा-MODI Hyderabad Tour: घराणेशाही असणारे पक्षच स्वत:ची तिजोरी भरतात- पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका
हेही वाचा-Samajwadi Party Rajya Sabha Candidate : समाजवादी पक्षाकडून राज्यसभेकरिता जयंत चौधरी यांचे नाव जाहीर