चेन्नई : राज्यातील कोरोना प्रसारावरुन मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. या प्रसारासाठी निवडणूक आयोगच जबाबदार असल्याचे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. मतमोजणीबाबत दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
..तर निवडणूक आयोगावर हत्येचा गुन्हा दाखल करा
मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी आणि न्यायमूर्ती सेंथिल कुमार यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाचा चांगलाच समाचार घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आयोग अगदीच बेजबाबदारपणे वागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर त्यांनी कडक कारवाई केली नाही, तर निवडणूक आयोगावर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा असे मत या खंडपीठाने मांडले.
यानंतर आता मतमोजणीदरम्यान योग्य ती खबरदारी बाळगळण्याचा इशाराही त्यांनी आयोगाला दिला. २ मे रोजी तामिळनाडूमधील विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणी पार पडणार आहे.