गुवाहाटी (आसाम) - आम्ही महाराष्ट्रावर यावे म्हणतात, आणि आमच्या ऑफिस, घरावर हल्ले होतात. कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांनी शपथीचे पालन करावे आणि त्यांनी आपले कर्तव्यपूर्ण करून हे थांबवण्याचे आदेश द्यावेत. शिवसेना कोणीही हायजॉक केलेली नाही, बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी गुवाहाटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. नोटीसांना उत्तर दिले जाईल, 24 तासांचा वेळ दिलेला आहे. त्यांना एक आठवड्याचा वेळ मागणार आहोत.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आताच राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेऊन शिवसेनेच्या बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता आता एकनाथ शिंदे गटाची पत्रकार परिषद घेतली. युतीच्या काळात राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे पडलेल्या उमेदवार यांना मोठ्या प्रमाणात मान दिला जात होता. मात्र शिवसेना आमदारांसोबत दुजाभाव केला जात असतो.
तुम्ही आणि भाजपाने एकत्रच राहावे मी असे नेहमी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. आम्हाला मोठ्या प्रमाणात या काळात सहन करावे लागले. त्यामुळे आमचा गट बाहेर आला आहे.
भाजपासोबत जाणार नाही, आम्ही हॉटेल मधील खर्च स्वतःच्या खर्चाने करत आहेत. आमदार आहोत स्वतःचा खर्च करू शकतोत असे केसरकर म्हणाले.
आम्ही स्वतंत्र्य गट म्हणून बाहेर पडू राजकारणात बसू शकतो. आमच्याकडे 2/3 मतदान आहे. त्यामुळे उपाध्यक्षांनी याबद्दल विचार करायला हवे. आम्ही त्यांच्याकडे काही बोलू शकत नाही ते खूप मोठे पद आहे. मात्र त्यांनी विचार करायला आहे.
आमदार कोर्टात केल्यावर त्यांना जरूर न्याय मिळेल, कारण आमच्याकडे मोठ्या प्रमाणात संख्या आहे. त्यामुळे उपाध्यक्षाविरोधात जाणे हे योग्य नाही मात्र न्यायासाठी कोर्टात जाण्याचा निर्णय घ्यावा लागेल.
आम्ही शिवसेनेतच आहोत. त्यांनी मुख्यमंत्री पदाची राजीनामा द्यावा अशी कोणीही मागणी केलेली नाही. आमची एवढीच अपेक्षा आहे की, सेना भाजप एकत्र यावी. अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेच्या शेवटी दिपक केसरकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - Shivsena National Executive Meeting : 'हिम्मत असेल तर तुमच्या बापाच्या नावाने मत मागा आणि निवडून या'