ETV Bharat / bharat

खाद्यतेल पुन्हा महागलं; तेलाच्या किंमतीत 15 ते 20 रुपयांची वाढ

दिल्लीमध्ये रिफाईन्ड ऑईलच्या दरात पाच रुपयांची तर इतर प्रकारच्या तेलाच्या किंमतीत 15 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. अशीच भाववाढ महाराष्ट्रातही दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी खाद्य तेलांच्या भावात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर सरकारने त्यात लक्ष घातल्याने दर कमी झाले. पण हा दिलासा काही दिवसांसाठीच राहिला. आता पुन्हा एकदा खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडतील असे चित्र उभे राहिले आहे.

Edible oil became expensive again
खाद्यतेल पुन्हा महागलं; खाद्यतेलाच्या किंमतीत 15 ते 20 रुपयांची वाढ
author img

By

Published : Aug 24, 2021, 2:37 PM IST

नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेल दरवाढीने सामान्य नागरिक त्रासले असताना आता खाद्य तेलाच्या वाढत्या दराने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गेल्या एका महिन्याच्या कालावधीत खाद्य तेलाचे भाव 20 टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून येते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या किमती या देशातील खाद्य तेलाच्या किंमती वाढण्यास कारणीभूत असल्याचे भारतीय उद्योग मंडळाने सांगितले आहे.

तेलाच्या किंमतीत 15 ते 20 रुपयांची वाढ -

दिल्लीमध्ये रिफाईन्ड ऑईलच्या दरात पाच रुपयांची तर इतर प्रकारच्या तेलाच्या किंमतीत 15 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. अशीच भाववाढ महाराष्ट्रातही दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी खाद्य तेलांच्या भावात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर सरकारने त्यात लक्ष घातल्याने दर कमी झाले. पण हा दिलासा काही दिवसांसाठीच राहिला. आता पुन्हा एकदा खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडतील असे चित्र उभे राहिले आहे.

...तरच तेलाचे भाव कमी होतील! -

लॉकडाऊन आणि अवकाळी पावसामुळे आधीच उत्पादन कमी झाले होते, तसेच खाद्यतेलाची आयात कमी झाली होती. एकिकडे पुरवठा कमी झाला असताना मागणी वाढली आहे. केंद्र सरकारने आता आयातीवरील कर कमी केले तरच तेलाचे भाव कमी होतील.

हेही वाचा - नारायण राणेंना अटक होऊ शकते पण... - असीम सरोदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.