ETV Bharat / bharat

Money Laundering Case: तामिळनाडूचे उच्चशिक्षण मंत्री पोनमुडींसह खासदार गौतम सिगामनींच्या घरावर ईडीचा छापा - मनी लाँड्रिंग प्रकरणी डीएमके नेत्यावर ईडीचा छापा

ईडीकडून तामिळनाडूचे उच्चशिक्षण मंत्री पोनमुडी आणि त्यांचे खासदार पुत्र गौतम सिगामनी यांच्या निवासस्थानावर छापेमारी करण्यात आली आहे. या दोघांच्या विरुद्धात मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे.

उच्चशिक्षण मंत्री पोनमुडीच्या घरावर ईडीचा छापा

author img

By

Published : Jul 17, 2023, 2:09 PM IST

उच्चशिक्षण मंत्री पोनमुडीच्या घरावर ईडीचा छापा

चेन्नई: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी तामिळनाडूचे उच्चशिक्षण मंत्री पोनमुडी आणि त्यांचे खासदार पुत्र गौतम सिगामनी यांच्या चेन्नईमधील घरावर छापा टाकला. या दोघांवर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असून त्याअंतर्गत छापा मारण्यात आला आहे. तामिळनाडूचे उच्चशिक्षण मंत्री पोनमुडी गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडार होते. डीएमके पक्षातील पोनमुडी हे दुसरे नेते आहेत. याआधी ईडीने सेंथिल बालाजी यांच्यावर मालमत्तेवर छापेमारी करत त्यांना अटक केली होती.

हे आहेत आरोप : या महिन्याच्या सुरुवातीला लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने पोनमुडी यांच्यासह इतर 6 जणांची जमीन बळकावल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता केली होती. 1996 आणि 2001 च्या काळात पोनमुडी यांच्यावर चेन्नईतील सैदापेट येथील सरकारी जमीन बेकायदेशीरपणे घेतल्याचा आरोप होता. या काळात ते द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) चे मंत्री होते. तसेच 2007 आणि 2011 मध्ये द्रमुकच्या राजवटीत पोनमुडी खाणमंत्री होते. त्यावेळी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत खाणीच्या अटींचे उल्लंघन केले होते. खाणींच्या अटींचे उल्लंघन करत पोनमुडी यांनी बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा केला होता, असा आरोपही त्यांच्यावर होता. याप्रकरणी विल्लुपुरम जिल्हा गुन्हे शाखा पोलिसांनी मंत्री पोनमुडी आणि जयचंद्रनसह 3 जणांना अटक केली होती. विल्लुपुरममधील खासदार आणि आमदारांविरुद्धच्या खटल्यांच्या सुनावणीसाठी विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

मुलगा गौतमची संपत्ती : पोनमुडी यांचा मुलगा गौतम चिकामणी याने या खटल्याच्या सुनावणीला स्थगिती द्यावी. तसेच खटला रद्द करण्याची मागणी करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार दिला. 2020 मध्ये पोनमुडीचा मुलगा गौतम सिगामनीची ईडीने चौकशी केली. त्यावेळी तपास संस्थेने त्याची 8.6 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. परदेशात कमावलेले परकीय चलन बेकायदेशीरपणे मिळवून ते परत न आणल्याचा आरोप सिगामनीवर होता. सिगामनी हे कल्लाकुरिची मतदारसंघाचे खासदार आहेत. गौतम सिगामनी यांच्याकडे तामिळनाडूमध्ये शेतजमीन, व्यावसायिक आणि निवासी इमारती तसेच बँक खात्यात 8.6 कोटी रुपये आणि शेअर्स आहेत.

हेही वाचा -

  1. EWS Case : EWS प्रकरणात डीएमकेने दाखल केली पुनरावलोकन याचिका
  2. प्रार्थनेप्रमाणे तामिळनाडूत डीएमके सत्तेत... ६० वर्षीय समर्थकाची पेटवून घेत आत्महत्या!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.