ETV Bharat / bharat

मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीचे छापे - मनी लॉंड्रिंगप्रकरणी अनिल परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीने छापे

मनी लॉंड्रिंगप्रकरणी अनिल परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. तसेच, परब यांच्यावर ईडीने गुन्हाही दाखल केला आहे अशीही माहिती समोर आली आहे. आज गुरुवार (दि. 26 मे)रोजी सकाळी पहाटे पासूनच ही छापेमारी सुरू झाली आहे. यावेळी परब यांच्या शासकीय निवास्थानीही छापेमारी करण्यात आली आहे.

अनिल परब
अनिल परब
author img

By

Published : May 26, 2022, 8:58 AM IST

Updated : May 26, 2022, 12:43 PM IST

मुंबई - मु्ंबई - मनी लॉंड्रिंगप्रकरणी अनिल परब यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. तसेच, परब यांच्यावर ईडीने गुन्हाही दाखल केला आहे अशीही माहिती समोर आली आहे. आज गुरुवार (दि. 26 मे)रोजी सकाळी पहाटे पासूनच ही छापेमारी सुरू झाली आहे. यावेळी परब यांच्या शासकीय निवास्थानीही छापेमारी करण्यात आली आहे.

  • Mumbai | Enforcement Directorate is questioning and recording the statement of Maharashtra transport minister Anil Parab as raids are underway at his locations in connection with an alleged money laundering case.

    — ANI (@ANI) May 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यासंबंधित 7 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. परब यांच्या संबंधित मुंबई, पुणे, रत्नागिरी येथे छापेमारी सुरू असून अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान असलेले मंत्रालयासमोर बंगल्यात देखील ईडीचे अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे या बंगल्यात अनिल परब देखील उपस्थित असल्याने आज ईडीकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजप नेते किरीट सोमैया यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केले होते.

  • Central investigation agencies have right (to search & raid) but they should not be misused powers. Don't know why this action has been taken against State Min Anil Parab. All I want to say is that action should be held in a transparent manner: Maharashtra Deputy CM Ajit Pawar pic.twitter.com/0koatg987l

शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्यांपैकी एक मानले जाणारे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या संबंधित सात ठिकाणी ईडीने कारवाई करताना छापेमारी केली आहे. अनिल परब यांच्या मालमत्तांवर ईडीचे छापे हे दापोली रिसॉर्ट आणि इतर ठिकाणी ही छापेमारी सुरु केली आहे. दरम्यान, याआधी अनिल परब यांच्या सीएच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनिल परब यांचे सीए आता आयकरच्या रडारवर होते. आता ईडीकडून झाडाझडती सुरु झाली आहे.
  • We're in support of Anil Parab. BJP is using central govt agencies against the opposition. This is just a conspiracy to defame the Maharashtra govt: Shiv Sena leader Sanjay Raut on searches involving Maharashtra minister and Shiv Sena leader Anil Parab were conducted by ED pic.twitter.com/lxzp5aT3zv

किरीट सोमय्या यांनी केंद्रात अनिल परब यांच्याविरोधात तक्रार केली होती. सचिन वाझे आणि १०० कोटींच्या प्रकरणातही अनिल परब यांचं नाव समोर आलं होत. परबांचे पार्टनर संजय कदम यांच्या घरातूनही मोठं घबाड हाती लागलं होतं. मनी लॉंडरिंग प्रकरणातील ईडीच्या या कारवाईनंतर परब यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्टवर देखील छापेमारी सुरू झाली आहे. सध्या महाराष्ट्रा राज्यसभेच्या जागेवरून शिवसेना चर्चेत आली आहे. संभाजीराजेंना शिवसेनेने मतदान करण्यास नकार दिल्यानंतर आज संजय राऊत आणि संजय पवार राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार आहे. त्याआधीच ही कारवाई झाल्याचं पाहायला मिळतंय.बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे अनिल देशमुखांचा खुलासा - अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. पोलीस खात्यात बदल्यांचं रॅकेट अनिल परब यांच्यामार्फत सुरू असल्याचा संशय यंत्रणांना आहे. याआधी किरीट सोमय्या यांनी परबांवर परिवहन खात्यात पैशांची अफरातफर केल्याचा आरोप केला होता.

परिवहन खात्यातीत अधिकारी बजरंग खरमाटे ही व्यक्ती परबांचा वाझे असल्याचा आरोपही झाला होता. या.सोबत अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणातही परब यांचा पाय खोलात गेला आहे. तसेच अनिल परब यांच्यावर सुमारे 50 कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय यंत्रणांना आहे. त्यातून या कारवाईला सुरुवात झाली आहे.

शिवसेना नेते अनिल परब यांच्या वांद्र्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने ही धाड टाकली असून मुंबईसोबतच पुण्यातील कोथरूड, हडपसर आणि लोणावळा या ठिकाणांचीही पाहणी केली जात आहे. ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले आहेत. यासोबत पुण्यातील अनिल परब यांच्या मालकीच्या जागांचीही पाहणी केली जात आहे.

हेही वाचा - नागपुरातील 4 थॅलेसेमियाग्रस्त मुलांची एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

Last Updated : May 26, 2022, 12:43 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.