रांची (झारखंड) : लष्कराशी संबंधित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक रांची आणि पश्चिम बंगालमध्ये छापे टाकत (army land case ED raid )आहे. ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित अग्रवाल यांची चौकशी केल्यानंतर लष्कराच्या जमिनीची बनावट कागदपत्रे बनवून जमिनीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले. चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे बरियाटू, रांची येथे लष्कराची सुमारे 50 एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. माजी महापालिका आयुक्तांसह अनेक सीओ आणि रजिस्ट्रार याप्रकरणी ईडीच्या रडारवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयडी आर्मी जमीन प्रकरणात झारखंडमधील 8 आणि पश्चिम बंगालमधील 4 तळांवर छापे टाकत (ED raid on several locations) आहे.
थोड्याच वेळात सविस्तर वृत्त...