ETV Bharat / bharat

आयएएस अधिकाऱ्याच्या सीएकडे सापडले कोट्यवधींचे घबाड.. सीएसह भावालाही झाली अटक

झारखंडच्या खाण आणि उद्योग विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांचा सीए सुमन कुमार आणि त्यांचा भाऊ पवन यांना ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

ED DETAINED CA SUMAN AND HIS BROTHER IN RANCHI
आयएएस अधिकाऱ्याच्या सीएकडे सापडले कोट्यवधींचे घबाड.. सीएसह भावालाही झाली अटक
author img

By

Published : May 7, 2022, 1:43 PM IST

रांची ( झारखंड ) : झारखंडच्या खाण आणि उद्योग विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांचा सीए सुमन कुमार आणि त्यांचा भाऊ पवन यांना ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी 16 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या पथकाने शनिवारी सकाळपासून सुमन आणि त्याचा भाऊ पवन यांची पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली आहे. ईडी लवकरच समन्स पाठवून आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांची चौकशी करू शकते.

सुमनला ज्योतिषशास्त्रातही रस आहे: IAS अधिकारी पूजा सिंघल यांचा हा CA मूळचा सहरसा, बिहारचा आहे. सुमनच्या परिचितांनी सांगितले की सुमनला शिक्षण घेत असताना ज्योतिषशास्त्राचीही खूप आवड होती. हस्तरेखाची अनेक पुस्तके ते वाचत असत. त्या काळात तो अगदी अचूक अंदाज वर्तवत असे. त्यामुळे भविष्य जाणून घेण्यासाठी त्याचे मित्र आणि नातेवाईक त्याच्यापर्यंत पोहोचायचे. सीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला. रांचीत आल्यानंतर सुमनचे नशीब बदलले आणि लवकरच तो करोडो रुपयांमध्ये खेळू लागला. बडे अधिकारी आणि उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा करण्याचे काम हा सुमनच्या डाव्या हाताचा खेळ होता. पण असं म्हणतात की जेव्हा नशीब वाईट असते तेव्हा जे इतरांचे भविष्य पाहणाऱ्यांना स्वतःच्या भविष्यातील काही दिसत नाही. सध्या सुमन ईडीच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. सुमनला त्यांच्या घरातून मिळालेल्या १९.३१ कोटींचा हिशेब ईडीला द्यायचा आहे.

शुक्रवारपासून छापेमारी सुरू : खरं तर, शुक्रवारी ईडीने खाण आणि उद्योग विभागाच्या सचिव पूजा सिंघल आणि तिच्या जवळच्या मित्रांच्या 25 ठिकाणांवर छापे टाकले. ईडीच्या छाप्यादरम्यान पूजा सिंघल आणि तिच्या जवळच्या मित्रांची सुमारे 150 कोटींची गुंतवणूक, संबंधित कागदपत्रेही हाती लागली आहेत. त्याचवेळी त्यांचा सीए सुमन कुमार यांच्या घरातून 19.31 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

पूजा सिंघलला समन्स : ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छाप्यात पूजा सिंघलविरोधात पुरेसे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे आता ईडी लवकरच पूजा सिंघलला चौकशीसाठी समन्स पाठवणार आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्स हॉस्पिटलमध्ये टाकलेल्या छाप्यांमध्येही हॉस्पिटलच्या मालकीसह अनेक ठिकाणी गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे सापडली आहेत. तपासादरम्यान या प्रकरणात झारखंड कॅडरच्या इतर नोकरशहा आणि व्हाईट कॉलर अधिकाऱ्यांची भूमिकाही समोर येऊ शकते. पूजा सिंघलच्या ठिकाणांहून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची चौकशी रांचीच्या एअरपोर्ट रोडवर असलेल्या ईडी कार्यालयातही सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी वित्त विभागासह इतर अनेक विभागांचे अधिकारीही गुंतले आहेत.

हेही वाचा : झारखंड सरकार पाडण्यात महाराष्ट्रातील माजी मंत्र्यांचा हात?; पोलीस पाठवणार नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.