ETV Bharat / bharat

नॅशनल हेराल्डची ७५१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, ईडीच्या कारवाईनंतर काँग्रेसचा भाजपावर निशाणा - मल्लिकार्जून खरगे नॅशनल हेराल्ड जप्ती

ED attaches properties National Herald सक्तवसुली संचालनालय (ईडी)नं काँग्रेस पुरस्कृत 'नॅशनल हेराल्ड' न्यूजपेपरच्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. ही कारवाई म्हणजे राजकीय सुडाचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेसनं भाजपावर केली आहे. तपासंस्था ही भाजपाची युतीमधील भागीदार आहे, असा टोला काँग्रेसने भाजपाला लगावला आहे.

National Herald Congress property
National Herald Congress property
author img

By PTI

Published : Nov 22, 2023, 7:44 AM IST

Updated : Nov 22, 2023, 5:08 PM IST

मुंबई ED attaches properties National Herald - ई़डीनं दिल्लीमधील 'नॅशनल हेराल्ड'चं कार्यालय आणि लखनौमधील नेहरू भवन आणि 'नॅशनल हेराल्ड'चे शेअर्स अशी एकूण ७५२ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली आहे. ईडीकडून काँग्रेस प्रवर्तक असलेल्या 'नॅशनल हेराल्ड' न्यूजपेपर आणि कंपनीचा मनी लाँड्रिंग प्रकरणात तपास सुरू आहे. पाच राज्यांची निवडणूक सुरू असताना ईडीनं ही मोठी कारवाई केल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे की, "भाजपाचा पाच राज्यांच्या निवडणुकीत पराभव होणार आहे. अशावेळी भाजपाकडून तपास संस्थांचा काँग्रेसविरोधात गैरवापर होत आहे. अशा प्रकारे भाजपाकडून तपासंस्थांचा गैरवापर होणं ही नवीन गोष्ट नाही. आता संपूर्ण देशासमोर हे उघड झालं आहे. ज्या आदर्शतत्त्वावर भारताच्या प्रजासत्ताकाची स्थापना झाली, त्याचं संरक्षण करण्यासाठी काँग्रेसकडून लढा सुरुच राहणार असल्याचा निर्धार मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केला. काँग्रेसचा देशाच्या नागरिकांवर पूर्ण विश्वास असल्याचंही काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी म्हटलं.

अभिषेक सिंघवी यांची भाजपावर टीका- काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी म्हटले की, सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव होत असताना भाजपाकडून इतरत्र लक्ष वळवण्याचा प्रयत्न आहे. भाजपाच्या आघाडीत सहभागी झालेली सीबीआय, ईडी किंवा प्राप्तिकर भाजपाला पराभवापासून वाचवू शकत नाही. राजकीय सूड घेण्याचं तंत्र हे काँग्रेसला घाबरवू शकत नाही. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात 'नॅशनल हेराल्ड'नं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, काँग्रेसशी संलग्न असल्यानं आणि काँग्रेसला वारसा असल्यानं ईडीनं कारवाई केली आहे. ई़़डीनं दिल्लीच्या आयटीओमधील नॅशनल हेराल्डचं कार्याल, लखौमधील कैसरबाग जवळील मॉल एव्हेन्यूमधील नेहरू भवन आणि मुंबईमधील हेराल्ड हाऊसवर जप्तीची कारवाई केल्याचं सूत्रानं सांगितलं.

  • Reports of attachment of AJL's properties by the Enforcement Directorate are a clear indication of the BJP's panic in the ongoing elections.

    Staring at defeat in Chhattisgarh, Madhya Pradesh, Rajasthan, Telangana and Mizoram, the BJP Govt feels compelled to misuse its… pic.twitter.com/pnJYnVartI

    — Mallikarjun Kharge (@kharge) November 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • ईडीचा काय आहे दावा? मनी लाँड्रिग प्रकरणात असोसिएटेड जर्नल्स लि (AJL) आणि यंग इंडियन (YI) कंपनीच्या मालमत्तेवर तात्पुरती जप्ती आणण्यात आली आहे. ही मालमत्ता ७५१.९ कोटी रुपयांची आहे.

नॅशनल हेराल्डची मालकी कुणाकडं? एजेएल आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शेअरहोल्डर आणि देणगीदारांची फसवणूक केल्याचा ईडीनं दावा केला आहे. 'नॅशनल हेराल्ड' हे दैनिक एजेएलकडून प्रसिद्ध करण्यात येते. तर दैनिकाची मालकी यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडं आहे. या कंपनीचे सर्वाधिक म्हणजे ३८ टक्के शेअर्स हे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडं आहेत.

निवडणुकीत पडसाद उमटणार? एकीकडं छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगाणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार रंगात आला आहे. या पाच राज्यांची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. दुसरीकडं काँग्रेस प्रवर्तक असलेल्या कंपनीविरोधात ईडीनं कारवाई केल्यानं भाजपाच्या हाती आयतं कोलीत मिळालं आहे. ईडीच्या कारवाईचे निवडणुकीत काय पडसाद उमटतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा-

Last Updated : Nov 22, 2023, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.