ETV Bharat / bharat

ED arrests Delhi Health Minister : ईडीकडून दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अटक, हवाला प्रकरणी 4.81 कोटी रुपये जप्त - दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन

सक्त अंमलबजावणी संचालनालयाने ( ED arrests Delhi Health Minister ) दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन ( Satyendar Jain arrest in New Delhi ) यांना अटक केली आहे. हवाला व्यवहाराशी संबंधित प्रकरणात अटक ( hawala transactions Delhi Minister ) केली आहे.

आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन
आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन
author img

By

Published : May 30, 2022, 7:42 PM IST

Updated : May 30, 2022, 9:08 PM IST

नवी दिल्ली- सक्त अंमलबजावणी संचालनालयाने ( ED arrests Delhi Health Minister ) दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन ( Satyendar Jain arrest in New Delhi ) यांना अटक केली आहे. हवाला व्यवहाराशी संबंधित प्रकरणात अटक ( hawala transactions Delhi Minister ) केली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. कोलकाता येथील एका कंपनीच्या हवाला व्यवहाराप्रकरणी सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या कंपन्यांची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. जैन हे अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारमध्ये आरोग्य, ऊर्जा, गृह, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), उद्योग, शहरी विकास, पूर, सिंचन आणि जल मंत्री आहेत. 2018 मध्ये, ईडीने या प्रकरणासंदर्भात शकूर बस्ती येथील आप आमदाराची चौकशी केली होती.

4.81 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त-अंमलबजावणी संचालनालयाने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी मालमत्ता जप्त करण्यासाठी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत तात्पुरता आदेश जारी केला आहे. अंदाजे 4.81 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आणि सुनील जैन यांच्या पत्नी इंदू जैन यांच्याशी संबंधित आहे. ईडीने सांगितले की, ही रक्कम जमीन खरेदीसाठी किंवा दिल्ली आणि आसपासच्या शेतजमीन खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली गेली.

केजरीवाल यांनी फेब्रुवारीमध्ये वर्तविला होता अंदाज- केजरीवाल यांनी फेब्रुवारीमध्ये सांगितले होते की पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी ईडी सत्येंद्र जैन यांना अटक करणार असल्याची माहिती त्यांना सूत्रांकडून मिळाली होती. मार्चमध्ये पंजाब विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत. आपचे उमेदवार भगवंत मान यांनी मुख्यमंत्री म्हणून सीमावर्ती राज्यात आपले सरकार स्थापन केले. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांचा कोलकात्यामधील कंपनीबरोबर हवालाच्या माध्यमातून गैरव्यवहार केल्याचा ईडीला संशय आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये आपचे सरकार आहे. अनेकदा यापूर्वी केंद्र सरकार व दिल्ली सरकारमध्ये वादाचे खटके उडाले होते.

हेही वाचा-Nepal plane crash: हिमालयाच्या डोंगरात सापडले विमानाचे अवशेष; सर्व 22 विमान प्रवाशांचा मृत्यू

हेही वाचा-UPSC Result : युपीएससीचा निकाल जाहिर, 685 उमेदवार पात्र, पहिल्या तीन क्रमांकांवर महिलांची बाजी

हेही वाचा-Rs 23 Crores of the amount :तेलंगणामध्ये एचडीएफसीचे दोन खातेदार चुकून झाले कोट्याधीश, खात्यावर 23 कोटींची रक्कम जमा

Last Updated : May 30, 2022, 9:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.